शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ‘शंभर फुटी’, खड्डे दीड फुटी

By admin | Updated: November 10, 2014 23:57 IST

चार प्रभागांत अडकला रस्ता : नगरोत्थान योजनेच्या मलमपट्टीमुळे खड्डे पाचविलाच

कोल्हापूर : खड्डे, धुळीचे साम्राज्य असा असलेला भाग म्हणजे मंगळवार पेठ-यल्लमा मंदिर-सुभाषनगर चौकापर्यंतचा रस्ता होय. हा रस्ता या चार प्रभागांत अडकला आहे. त्यातच महापालिका प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे.सतत वर्दळीचा व दाट लोकवस्तीचा असलेला जवाहरनगर, नेहरूनगर, सुभाषनगर भाग होय. या भागात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पण गेल्या दहा ते १५ वर्षांपासून या भागाचा विकास झाला नाही. या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यात प्रशासन उदासीनता दाखवीत आहे. तसेच रस्त्याकडेला असलेल्या गटारी बुजल्यामुळे पाणी रस्त्यावर येते. त्यातच रस्त्यावरील धूळ व अस्वच्छतेमुळे नागरिक वैतागले आहेत. मंडलिक रस्त्याकडून यल्लमा मंदिराकडे निघालेला हा रस्ता कागदावर शंभर फुटी आहे; पण तो प्रत्यक्षात शंभर फुटी झालेला नाही. सुभाषनगर रस्त्यावर यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या रस्त्यावर मोठमोठे दगड व खड्डे आहेत. त्यांमुळे अपघात होण्याचा धोका संभव आहे. हा रस्ता शास्त्रीनगर, जवाहरनगर, नेहरूनगर, संभाजीनगर व स्वातंत्र्यसैनिक वसाहत या चार प्रभागांत अडकला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.‘नगरोत्थान’मधील रस्ता असूनही निकृष्टहा रस्ता नगरोत्थान योजनेमधून सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. रस्त्याला डांबर लागलेले नाही. केवळ मोठी खडी टाकून त्यावर तात्पुरती मलमपट्टी केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.वाहतुकीची कोंडीदर मंगळवारी व शुक्रवारी यल्लमा मंदिरात भाविकांची गर्दी होते. या मंदिराकडून शाहू सेना चौकापर्यंतचा रस्ता खराब आहे. यामधून वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे हा रस्ता नवीन करावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.