शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस

By admin | Updated: February 23, 2015 00:16 IST

कोल्हापूर पोलिसांकडून जाहीर

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्यभरातील अनुभवी तपास अधिकारी आठ दिवस कोल्हापुरात तळ ठोकून आहेत; परंतु हत्येसंबंधीचा धागादोरा त्यांच्या हाती न लागल्याने तपासात प्रगती झाली नसल्याने पोलिसांच्या विरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, पानसरे यांची हत्या करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस कोल्हापूर पोलिसांनी जाहीर केले आहे.पानसरे यांची झालेली हत्या ही सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का? त्यापासून कोणी दुखावलं होतं का, अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी या सर्व पातळ्यांवर माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही. या घटनेतील वस्तुस्थिती जखमी उमा पानसरे यांच्या जबाबातूनच समोर येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रुग्णालयात जाऊन उमा पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत जबाब घेण्याचा व मारेकऱ्यांचे रेखाचित्र दाखविण्याचा प्रयत्न केला; परंतु डॉक्टरांनी त्या धक्क्यातून सावरल्या नसल्यामुळे काही बोलणार नाहीत. थोडा वेळ द्या, त्यानंतर त्या सर्व माहिती देतील, असे सांगितले. त्यामुळे त्यांचा जबाब झालेला नाही. तपासात अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारी म्हणून पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी दोनशेहून अधिक जणांकडे चौकशी केली तसेच यापूर्वी पिस्तूल तस्कर मनिष नागोरी, आरसी गँगसह गारगोटी व सांगली येथील ३५ पेक्षा जास्त गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत पोलिसांना संशयास्पद काही आढळले नाही. उपस्थित होणाऱ्या शक्यतांचा अभ्यास करून तपासाची पुढील दिशा ठरविली जात असल्याचे पोलीस सांगत आहेत. संशयास्पद मोटारसायकलीच्या फोटोने खळबळअ‍ॅड. पानसरेंवर गोळीबार झाला, त्यादिवशी कोल्हापूरमधील रिंग रोडवरील रस्त्यावरच्या विभाजकावर आदळलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचे फोटो रविवारी वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी बेवारस स्थितीत मिळून आलेल्या मोटारसायकलींची चौकशी केली असता त्यांचा हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.