शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST2021-03-06T04:24:21+5:302021-03-06T04:24:21+5:30

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शनिवारी (दि.६) बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती ...

Retired employees of Shikshak Bank agitate today | शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन

शिक्षक बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आज आंदोलन

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शनिवारी (दि.६) बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी पत्रकातून दिली.

बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यातील फरक रक्कम २०१२ पासून देय आहे. न्यायालयाने निकाल देऊनही बँक व्यवस्थापनाकडून सदर बाब न्यायप्रविष्ट करून प्रलंबित ठेवली जात आहे. कर्मचाऱ्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे. याबाबत व्यवस्थापनाशी अनेक वेळा चर्चा होऊन मार्च २०२० नंतर फरक रक्कम देण्याचे मान्य केले होते. मात्र अद्यापही त्याची पूर्तता केलेली नाही. कोरोनाचे सर्व शासकीय नियमांचे पालन करून शांततेत शनिवारी (दि.६) सकाळी ११ वाजता बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकातून दिली.

Web Title: Retired employees of Shikshak Bank agitate today