शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी पुजारीच नेमण्याचा होणार ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:06 IST

महापालिका सभा : अजेंड्यावर विषय

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजारी हटवून त्या ठिकाणी शासननियुक्त पुजारी नेमण्यात यावेत, असा ठराव उद्या, गुरुवारी होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर होण्याची शक्यता आहे. ‘सर्वपक्षीय पुजारी हटाव समिती’ने तशी मागणी महापौर हसिना फरास यांच्याकडे केली होती; तिची दखल घेत हा ठराव गुरुवारी होणाऱ्या सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आला आहे. कोल्हापूर शहरात सध्या अंबाबाई मंदिरातील हक्कदार पुजारी हटवावेत, या मागणीसाठी लोक आंदोलन उभे राहिले आहे. नुकताच जिल्हा परिषदेच्या सभेत हक्कदार पुजाऱ्यांना हटवून तेथे शासननियुक्त पुजारी नेमण्यात यावेत, असा ठराव एकमताने मंजूर झाला आहे. याच पद्धतीने तो महानगरपालिकेच्या सभेतही व्हावा, अशी विनंती पुजारी हटाओ समितीने महापौरांना भेटून केली होती. त्यानुसार महापालिकेच्या गुरुवारी होणाऱ्या सभेत हा ठराव केला जाणार आहे. शैक्षणिक संस्थेला जागा?मंगळवार पेठेतील ६२४ बी मधील महानगरपालिकेच्या मालकीची २००० स्क्वेअर फुटांची जागा हिंद एज्युकेशन सोसायटीला शाळा इमारत बांधण्यासाठी नाममात्र एक रुपया भाड्याने वीस वर्षे कराराने देण्याचा सदस्य ठरावही सभेत येणार आहे. शहरातील दिव्यांगांना केबिन वाटप करण्यात येत असून, काही दिव्यांगांनी जागा बदलून मागितली असल्याने त्यावरही उद्या, गुरुवारच्या सभेत निर्णय अपेक्षित आहे. स्टुडिओच्या जागेवर बांधकाम नको शहरातील शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा स्टुडिओ यांच्या सध्या शिल्लक असणाऱ्या मोकळ्या जागेवर कोणत्याही प्रकारच्या बांधकामास तसेच इतर व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये, असा सदस्य ठराव महासभेसमोर आला आहे. जुन्या काळातील अभिनेत्री असलेल्या नगरसेविका सुरेखा शहा यांनी हा ठराव मांडला आहे. कोल्हापूरची अस्मिता, कलानगरीचा नावलौकिक अजरामर, तसेच ऐतिहासिक ठेवा कायम राहावा, अशी अपेक्षा नगरसेविका शहा यांनी व्यक्त केली आहे.