शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनविषयक ‘आविष्कार’ १७ पासून; साताऱ्यामधून प्रारंभ

By admin | Updated: December 10, 2014 00:30 IST

शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या महोत्सवाचे वेळापत्रक

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती रुजविण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी ‘आविष्कार’ हा आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सव सुरू केला आहे. शिवाजी विद्यापीठात जिल्हास्तरीय, पदव्युत्तर आणि मध्यवर्ती गटात यावर्षी महोत्सव होईल. त्याची सुरुवात जिल्हास्तरीय महोत्सवाने १७ डिसेंबरपासून साताऱ्यामधून होणार आहे.या महोत्सवात सहा गटांतर्गत मानव्यशास्त्र, भाषा, कला, शिक्षण, वाणिज्य, व्यवस्थापन, विधि, शुद्धशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आदी विद्याशाखांमधून स्पर्धा होईल. जिल्हास्तरीय महोत्सवात पदवीपर्यंतचे विद्यार्थी, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्'ांतील विद्यार्थी, संशोधक व शिक्षक हे पदव्युत्तर विभागात सहभागी होऊ शकतात. यावर्षी दहिवडी महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट यांना जिल्हास्तरीय महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. जिल्हा व पदव्युत्तर विभागापातळीवर विजेते स्पर्धेक शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या मध्यवर्ती स्पर्धेत सहभागी होतील. (प्रतिनिधी)शिवाजी विद्यापीठात होणाऱ्या महोत्सवाचे वेळापत्रक१७ डिसेंबर : दहिवडी महाविद्यालय (माण, सातारा जिल्हास्तरीय) १९ डिसेंबर : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (वाळवा, सांगली)२२ डिसेंबर : अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट (वाठार, कोल्हापूर)२४ डिसेंबर : रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ (पदव्युत्तर विभाग)२ जानेवारी : रसायनशास्त्र विभाग, विद्यापीठ (मध्यवर्ती महोत्सव)