शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मनोरूग्णांच्या नातेवाईकांकडून परतीचे दरवाजे बंद

By admin | Updated: September 12, 2014 23:30 IST

तोंडात दात नाहीत, डोक्यावर केस नाहीत, वार्धक्याने शरीर झुकले आहे.

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरीतोंडात दात नाहीत, डोक्यावर केस नाहीत, वार्धक्याने शरीर झुकले आहे. हातापायात तर त्राणच नाही. सामाजिक संस्थांनी दिलेल्या व्हीलचेअरवरचा प्रवास. त्यातले काहीजण आजही मानसिक आरोग्य संतुलित नसलेले. पण काहीजण पूर्वपदावर आलेले. पण जीवाभावाचे नातेवाईक हात सोडून गेले असल्याने अख्खं आयुष्यच मानसिक आरोग्य संस्थेच्या चार भिंतींमध्ये कोंडलेलं.. ही व्यथा रत्नागिरीतील मानसिक आरोग्य संस्थेतील अनेक रूग्णांच्या नशिबी आली आहे. नातेवाईकांनी कसलीच आस्था न दाखवता त्यांची साथ सोडल्यामुळे ते इथेच खितपत पडले आहेत.मानसिक संतुलन बिघडल्याने वयाच्या अवघ्या २० व्या किंवा २२ व्या वर्षी मनोरूग्णालयात दाखल केलेल्या काही रूग्णांना अवघे आयुष्यच मनोरूग्णालयात घालवावे लागले. सध्या ७५ ते ८५ वयोगटातील २० रूग्ण येथे आहेत. १९६१पासून काही मंडळी दाखल आहेत. लहान बाळाप्रमाणे या मंडळींची काळजी घ्यावी लागते. त्यांची ओळख पटत नाही, नातेवाईकांनी संपर्काचे चुकीचे पत्ते दिले आहेत. त्यामुळे या मंडळींना घरचे दरवाजेच बंद झाले आहेत.येथील कर्मचारी मात्र त्यांना वेळेत खाऊपिऊ घालण्याबरोबर आंघोळीपासून स्वच्छता ठेवण्यापर्यंत प्रत्येक काम मनात कोणताही किंतु न बाळगता करतात. त्यांची पूर्ण काळजी घेतात.जे २९ वृध्द याठिकाणी आहेत त्यांना अंतिम श्वासापर्यंत याठिकाणीच राहायचे आहे, हे निर्विवाद! कारण या मंडळींना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना नाकारलं आहे. काहींच्या नातेवाईकांचा शोधच लागत नाही. काही वृध्द मनोरूग्णांनी शेवटचा श्वासही येथेच घेतला आहे. मृत्यूनंतर पोलिसांना कल्पना दिली जाते. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा केला जातो. मृत्यूनंतर तीन दिवस संबंधितांच्या नातेवाईकांची वाट पाहून त्यानंतर नियमाप्रमाणे शव येथील नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येते. आणि मग वारसदारांनी साथ सोडलेल्या या दुर्दैवी जीवांवर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार होतात.व्यवसाय उपचार केंद्रातून पुनवर्सनमानसिक आरोग्य बिघडलेला रूग्ण कोणालाच नको असतो. किंबहुना त्याच्यामुळे समाजातील प्रतिष्ठा बिघडू नये, यासाठी नातेवाईक रूग्णांना थेट मनोरूग्णालयात दाखल करतात. मात्र, त्यांच्यावर उपचार करताना व्यवसाय कौशल्याच्या माध्यमातून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी प्रादेशिक मनोरूग्णालय धडपडत आहे. मनोरूग्णाच्या आजाराची लक्षणे, शिक्षण, कुटुंब व्यवस्था व पार्श्वभूमी याची दखल घेऊनच व्यवसाय शिकविले जातात. शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, क्राफ्ट, ज्वेलरी मेकिंग, स्क्रीनप्रिंटिंग, सुतारकाम, बागकाम, शेती याशिवाय संगणक अभ्यासही शिकविला जातो. काहीजण स्वयंपाकघरातही काम करतात. हे सर्व सुरू असताना त्यांच्या वैद्यकीय उपचाराकडेही लक्ष देण्यात येते.