शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात आज रेड अलर्ट; गगनबावडा, कागलमध्ये अतिवृष्टी, १३ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:11 IST

जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचा इशारा 

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाने दिवसभर उघडीप दिली असली तरी रात्री जोरदार कोसळत आहे. गगनबावडा, कागल तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, १३ बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे. पुढील २४ तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.भारतीय हवामान खात्याने सोमवारी सायंकाळी पाचनंतर २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. गेले आठ दिवस जिल्ह्यात पावसाने ठिय्या मांडला आहे. यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. उन्हाळी भुईमूग, भात, सूर्यफूल खराब होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.ऐन उन्हाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेल्याने नदीकाठावरील कमी उंचीची पिके अडचणीत आली आहेत. गगनबावडा, कागल, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात अर्धा फुटांनी वाढली असून रात्री सात वाजता १९ फुटांपर्यंत पोहोचली आहे.

शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडेसोमवारी सकाळी आकाश मोकळे दिसत होते, त्यामुळे पाऊस उसंत घेईल असे वाटत होते. पाऊस थांबणार कधी? मशागत करून खरिपाची पेरणी कधी करायची? या चिंतेत शेतकरी आहे. त्यामुळे रोज उठले की त्याच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असतात.

तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा-

  • हातकणंगले - ३३.२
  • शिरोळ -२६.१
  • पन्हाळा - ३१.९
  • शाहूवाडी - ५०.०
  • राधानगरी - ४८.२
  • गगनबावडा - १०२.४
  • करवीर - ४५.४
  • कागल -६५.०
  • आजरा - ५१.५
  • भुदरगड - ४४.४
  • चंदगड - ३५.३
  • गडहिंग्लज - ५०.२
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी