रंगकर्मी मनिषा राजोपाध्ये यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:00+5:302021-08-18T04:30:00+5:30

कोल्हापूर : येथील रंगकर्मी मनिषा राजोपाध्ये - शहा (वय ५०) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. प्रसिद्ध दिवंगत वेशभूषाकार भानू ...

Rangkarmi Manisha Rajopadhyay passed away | रंगकर्मी मनिषा राजोपाध्ये यांचे निधन

रंगकर्मी मनिषा राजोपाध्ये यांचे निधन

कोल्हापूर : येथील रंगकर्मी मनिषा राजोपाध्ये - शहा (वय ५०) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. प्रसिद्ध दिवंगत वेशभूषाकार भानू अथय्या या त्यांच्या आत्त्या होत. मनिषा या काेरोनातून बऱ्या झाल्या होत्या पण त्यानंतर फुफ्फुसांना संसर्ग झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कागल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती व दोन बहिणी असा परिवार आहे.

मनिषा राजोपाध्ये या कोल्हापुरात राजोपाध्ये वाडा येथे राहायचे विवाहानंतर त्या मनिषा समीर शहा झाल्या. त्या कागलमध्ये राहायचे महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी अभिरूची, प्रत्यय नाट्य संस्थांच्या माध्यमातून हौशी रंगभूमीवर अनेक भूमिका साकारल्या. विशेषतः ‘किंग लियर', ‘विमोचन', ‘अठरावा उंट' या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यातील काही भूमिकांना अभिनयाची रौप्यपदक ही मिळाली. लोकराजा राजर्षी शाहू मालिकेत त्यांनी रणरागिणी ताराराणींची भूमिका साकारली होती. त्याशिवाय दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटातही भूमिका केल्या.

---

फोटो नं १७०८२०२१-कोल-मनिषा राजोपाध्ये (निधन)

---

Web Title: Rangkarmi Manisha Rajopadhyay passed away