शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

भीतीपोटी वाहनचालकांच्या पंपांवर रांगा

By admin | Updated: November 4, 2016 00:39 IST

पेट्रोलपंपचालकांचे आंदोलन : तेल कंपन्यांबरोबर आज मुंबईत बैठक; यानंतर ठरणार दिशा

 कोल्हापूर : पेट्रोलपंप चालकांच्या आंदोलनामुळे होणारा संभाव्य तुटवडा लक्षात घेता, तेल कंपन्यांनी आज, शुक्रवारी पंपचालकांच्या संघटनेला बैठकीसाठी पाचारण केले आहे. ही बैठक मुंबई येथील तेल कंपन्यांमध्ये होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली. दरम्यान, प्रशासनानेही ग्राहकांसह अत्यावश्यक प्रसंगासाठी पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याची सूचना केली आहे. या आंदोलनामुळे सर्व पेट्रोलपंपांवर दिवसभर वाहनधारकांची गर्दी होती. विविध मागण्यांसाठी देशभरातील पेट्रोल, डिझेल वितरकांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनामुळे पुढे होणारी ग्राहकांची कुचंबणा लक्षात घेता, तेल कंपन्यांनी वितरकांच्या सर्वोच्च अशा कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन पेट्रोलियम डीलर व आॅल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या सदस्यांना आज, शुक्रवारी मुंबई येथे सकाळी साडेअकरा वाजता तेल कंपन्यांमध्ये बैठकीसाठी पाचारण केले आहे. ही बैठक भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आॅयल-आयबीपी या कं पन्यांमध्ये आयोजित केली आहे. यात पंपचालकांच्या मागण्यांवर विचारविनमय होणार आहे. त्यानुसार उद्या, शनिवारपासून होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी या क्षेत्रांसाठी तेलपुरवठा करणाऱ्या मिरज, भिलवडी येथील डेपोंमधून डिझेल, पेट्रोलची उचल झालेली नाही. या डेपोंमधून विविध पंपचालक दररोज किमान २६० टँकर इतकी इंधनाची खरेदी करतात. मात्र, पंपचालकांपैकी एकाही वितरकाने एकही टँकर येथून बाहेर नेलेला नाही. केवळ एस. टी. महामंडळाने १५ टँकर डिझेल खरेदी केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी अत्यावश्यक प्रसंगी वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा, शासकीय वाहने यांना पेट्रोल, डिझेल कमी पडणार नाही, याची दखल घ्यावी, अशी सूचनापत्रे वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींना पाठविली आहेत. त्यानुसार नियोजन न झाल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदीचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.