शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update Kolhapur: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगा पात्राबाहेरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 11:23 IST

संभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून जोरदार बरसणाऱ्या वरुणराजाने आज, बुधवारी सकाळपासून उघडीप घेतली आहे. मात्र, जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. गगनबावड्यासह चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पंचगंगेची पाणी पातळी आज, ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. २७ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काल, मंगळवारीच सायंकाळी ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत राहिला. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मंगळवारी रात्रभर अति मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य महापुराची तयारी म्हणून मंगळवारी सायंकाळी ‘ एनडीआरएफ ’ च्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.आज, सकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३१ फूट ४ इंच इतकी झाली आहे. इशारा पातळी ३९ फूट असून मंगळवारी सकाळी आठ ते रात्री पर्यंत पंचगंगेच्या पातळीत तब्बल ५ फुटाने तर सोमवारच्या तुलनेत तब्बल १२ फुटांची वाढ झाली. पाणी काठावर आले असून कोणत्याही क्षणी पंचगंगा पात्राबाहेर पडू शकते.

‘वारणा’ च्या पातळीत अर्धा टीएमसीची वाढ

धरणक्षेत्रात पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे पाणी पातळी वाढ होत असून सोमवार ते मंगळवार एका दिवसात वारणा धरणात तब्बल अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली. राधानगरी धरणातून ०.२८, तुळशी मध्ये ०.०७ तर दूधगंगा धरणात ०.४२ टीएमसीने पाणी साठा वाढला आहे.

जोर वाढला तर आजपासून स्थलांतर

पावसाचा जोर वाढत गेला तर आज, बुधवारपासून पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील पाऊस व संभाव्य पूर स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला. यामध्ये महसूल यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नदी काठच्या नागरिक धास्तावले

कुंभी, कासारी, पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे धास्तावले असून पुन्हा २०२१ च्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत.27 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्गराधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.नदीकाठच्या गावांचे आजपासून स्थलांतरसंभाव्य पूर परिस्थिती पाहून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, आजपासून नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी काल, मंगळवारी बैठकीत याबाबत माहिती दिली. . मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी