शिवाजी रोडवर मटका अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST2021-06-11T04:17:16+5:302021-06-11T04:17:16+5:30

कोल्हापूर : येथील शिवाजी रोडवर कराड बॅकेच्या पाठीमागे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ...

Raid on Matka Adda on Shivaji Road | शिवाजी रोडवर मटका अड्ड्यावर छापा

शिवाजी रोडवर मटका अड्ड्यावर छापा

कोल्हापूर : येथील शिवाजी रोडवर कराड बॅकेच्या पाठीमागे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ६६०० रुपये व साहीत्य जप्त केले. हर्षद इम्तीयाज मोमीन (वय ३२ रा. मंगळवार पेठ)

शिवाजी इश्वरा शिंदे (६५, रा. खेडकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे असून मधुकर तोडकर (रा. फिरंगाई गल्ली, शिवाजी पेठ) हा मालक फरारी आहे.

येथील शिवाजी रोडवर कल्याण मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुरुवारी तेथे पाळत ठेवून छापा टाकला. यावेळी पोलिसांनी पळून जाणाऱ्या हर्षद मोमीन, शिवाजी ईश्वरा शिंदे या दोघांना पकडले, त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील ६६०० रुपये तसेच कल्याण मटका जुगाराचे साहित्य जप्त केेले. याप्रकरणी मुख्य सूत्रधार मटका मालक मधुकर तोडकर यांच्यावर गुन्हा नोंद झाला. अटक केलेले दोघेही तोडकर याच्याकडे कमिशनवर काम करत असल्याचे तपासात उघड झाले.

Web Title: Raid on Matka Adda on Shivaji Road