‘अभाविप’कडून राहुल गांधी यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 10:58 IST2019-12-16T10:57:43+5:302019-12-16T10:58:57+5:30

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), कोल्हापूर शाखेकडून कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रविवारी ...

Rahul Gandhi protests by 'Abhayavip' | ‘अभाविप’कडून राहुल गांधी यांचा निषेध

‘अभाविप’कडून राहुल गांधी यांचा निषेध

ठळक मुद्दे‘अभाविप’कडून राहुल गांधी यांचा निषेधकाँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोरील प्रकार

कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), कोल्हापूर शाखेकडून कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रविवारी सायंकाळी निषेध नोंदविण्यात आला. 

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्याचा निषेध आम्ही रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुतळा दहनाने केला. 

पुतळा दहनावेळी उपस्थितांनी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा दिल्या. यावेळी सचिन कोलकर,अद्वैत पत्की, गुरुदत्त खानोलकर, आदी उपस्थित होते. दरम्यान, पुतळा दहनाने निदर्शने करण्यापूर्वी जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयातील उपस्थित एका पदाधिकाऱ्याने ही निदर्शने करणाऱ्यांना अटकाव केला. हा विरोध झुगारुन अभाविपकडून निदर्शने करण्यात आली.

 कोल्हापुरात काँग्रेस जिल्हा कार्यालयासमोर ‘अभाविप’च्या कोल्हापूर शाखेकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
 

 

Web Title: Rahul Gandhi protests by 'Abhayavip'