शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांना काळ्या यादीत घाला

By admin | Updated: December 17, 2014 23:10 IST

कुरुंदवाड पालिका सभा : डिजिटल फलक कर; सुधारित पाणी योजनेसह विविध ४८ विषयांना मंजुरी

कुरुंदवाड : पाण्याच्या टाकीचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. ठेकेदारांना मुदतवाढ देऊ नये, त्याचे नाव काळ्या यादीत घाला, अशी मागणी उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे यांनी केली. ठेकेदारांना पाणीपुरवठ्याचे आप्पासाहेब शेडबाळे हे पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कडाळे व रामचंद्र डांगे यांनी केली. अखेर प्रशासन लिपिक बजरंग ढेरे यांनी कारवाईचे आश्वासन दिले. शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यासाठी काल, मंगळवारी नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय खोत होते. शहरातील डिजिटल फलक कर, पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी, सुधारित पाणीपुरवठा योजना, विविध प्रभागांत रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे यांसह ४८ विषयांना येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. शहरात डिजिटल फलक लावण्यासाठी सहा दिवसांसाठी दोनशे रुपये कर त्यानंतर लावल्यास दिवसाला २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अल्ट्रासोनिक प्लो मीटर बसविणे, दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत कोले यांच्या घराजवळ पाण्याच्या टाकीपासून विठ्ठल मंदिरापर्यंत पाईपलाईन टाकणे, शहरातील काही प्रभागांत रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, एस.पी. हायस्कूल ते दत्त महाविद्यालयापर्यंत रविवारी अतिरिक्त बाजार भरविणे. नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविणे यांसह ४८ विषयांना मंजुरी देण्यात आली. पक्षप्रतोद गणपतराव पोमाजे, रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील, बाबासाहेब भबिरे, विलास उगळे, बांधकाम सभापती वैभव उगळे, शरद आलासे, धोंडुबाई बागवान, माधुरी सावगावे, मनीषा डांगे, कमरुन हुक्कीरे, विमल जोंग, कृष्णाबाई मधाळे, मुबिना बागवान यांच्यासह प्रशासन लिपिक बजरंग ढेरे, संजय बत्ते, आर. ई. कुंभार, प्रियांका माने, प्रताप ढोणे, आप्पासाहेब शेडबाळे, नामदेव धातुंडे उपस्थित होते. (वार्ताहर)