शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपुष्यामृत योगावर दागिन्यांची खरेदी; दर उतरल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

कोल्हापूर : सोन्याचे उतरलेले दर आणि गुरुपुष्यामृत या योगावर गुरुवारी कोल्हापूरकरांनी सोन्या-चांदीच्या अलंकारांची खरेदी केली. यानिमित्त गुजरीसह ब्रॅन्डेड दागिन्यांच्या ...

कोल्हापूर : सोन्याचे उतरलेले दर आणि गुरुपुष्यामृत या योगावर गुरुवारी कोल्हापूरकरांनी सोन्या-चांदीच्या अलंकारांची खरेदी केली. यानिमित्त गुजरीसह ब्रॅन्डेड दागिन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होते.

नव्या वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत गुुरुवारी होता. त्यातच गेल्या पाच-सहा दिवसात सोन्याचा दर सातशे ते आठशे रुपयांनी कमी झाला आहे. गुरुवारी सोन्याचा दर ४९ हजार १०० रुपये १० ग्रॅम आणि चांदीचा दर ६७ हजार रुपये किलो असा होता, त्यामुळे नागरिकांनी चोख सोन्यासह विविध प्रकारच्या घडणावळीचे अलंकार खरेदी केले. सध्या लग्नसराई नसली तरी पुढील कार्यासाठी म्हणून दागिने बनवण्यासाठीची ऑर्डर दिली जात आहे. मार्च-एप्रिलमध्ये लग्नसराई सुुरू होते. या काळातील तयारी म्हणून आताच अलंकारांची खरेदी होत आहे. चोख सोने घेतल्यानंतर त्यावर आणि दागिन्यावरही जीएसटी द्यावी लागते त्यामुळे अनेक ग्राहकांनी चोख सोन्याऐवजी लहान मोठ्या अलंकारांवर भर दिला आहे. यात कानातले, टॉप्स, ॲन्टीक ज्वेलरी, ठुशी, कोल्हापुरी साज अशा अलंकारांचा समावेश आहे, अशी माहिती चिपडे सराफचे मुरलीधर चिपडे यांनी दिली.

--

फोटो नं २८०१२०२१-कोल-गुरुपुष्यामृत फोटो

ओळ : गुरुपुष्यामृतनिमित्त गुरुवारी कोल्हापुरातील सराफ शोरूममध्ये नागरिकांनी दागिने खरेदीचा आनंद घेतला. (छाया : नसीर अत्तार)

--