शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाव मोहीमेस ‘भूमाता’चा पाठींबा : तृप्ती देसाई

By admin | Updated: June 20, 2017 18:10 IST

माझ्या गणवेशाला विरोध करणाऱ्यांनी देवीस घागरा चोली घालणे निषेधार्ह

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २0 : येथील अंबाबाई मंदीरात पुजाऱ्यांच्या मनमानीला विरोध करत पुजारी हटाव मोहीमेला भूमाता ब्रिगेडचा पाठींबा असल्याचे प्रतिपादन तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केले.देसाई मंगळवारी दुपारी कोकण दौऱ्यावर जाताना त्या कोल्हापूरात काही वेळ थांबल्या. कोल्हापूर महापालिकेत रस्ते हस्तांतराच्या नावाखाली दारु व्यवसायिकांना पाटबळ देणारा ठराव मंजूर करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर त्या ठरावाला विरोध दाखविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. देसाई म्हणाल्या, अंबाबाई मंदीरात महिलांना गाभारा प्रवेशावेळी आम्ही परिधान केलेल्या चुडीदार गणवेशाला या पुजाऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यावेळी भाडोत्री गुंडाकरवी या पुजाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला, शिवीगाळ केली. महिलांनी मंदीरात प्रवेशताना कोणता ड्रेस कोड वापरावा हे ठरविणारे हे पुजारी कोण? असा प्रश्न करत देसाई म्हणाल्या, चुडीदारच्या नावाखाली माझ्यावर हल्ला करणाऱ्या या पुजाऱ्यांनीच आता अंबाबाई देवीला साडीऐवजी घागरा-चोली गणवेश घातला. ही पुजाऱ्यांनी मनमानी मोडीत काढली पाहिजे. त्यामुळे या मंदीरातील पुजारी हटाव मोहीमेला भूमाता ब्रिगेडचा पूर्णतहा पाठींबा आहे, तसेच या आंदोलनात भूमाता उतरेल असेही वक्तव्य तृप्ती देसाई यांनी यावेळी केले.