शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा स्वतंत्र न्यायालयासाठी प्रस्ताव

By admin | Updated: December 11, 2015 00:53 IST

दावे प्रलंबित : राज्य सरकारकडे मागणी

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कामकाजासंबंधी जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांची संख्या, त्यावर निकाल देण्यास होत असलेला विलंब आणि पक्षकारांची होणारी दमछाक लक्षात घेता पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेतही एक स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांचे दावे जिल्हा न्यायालयात दाखल होत असतात. सध्या ७०० ते ८०० दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचे मनुष्यबळ आणि पैसाही वारेमाप खर्च होत आहे. एखाद्या दाव्यावर कधी निकाल लागेल हे काही सांगता येत नाही, त्यामुळे त्यात वेळ खूप जातो. जिल्हा न्यायालयात इतर दाव्यांतून महानगरपालिकेसाठीच्या दाव्यांना तारखा मिळण्यास वेळ लागत आहे. या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या इमारतीतच एक स्वतंत्र न्यायालय सुरू करावे, अशी मागणी मनपा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. महानगरपालिकेच्या विधी विभागातील वकील न्यायालयात दावे लवकर निकाली निघावेत म्हणून प्रयत्न करत नाहीत, असेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे स्वतंत्र न्यायालय झाले तर याचिकाकर्त्यांना लवकर न्याय मिळेल, त्यांचा वेळ वाचेल असा मनपा प्रशासनाचा दावा आहे. (प्रतिनिधी)