शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ‘सीसीटीव्ही’चा प्रस्ताव पडून

By admin | Updated: January 13, 2015 00:05 IST

सुरक्षेचा प्रश्न : तीन कोटींचा आराखडा पालकमंत्री मार्गी लावणार का ?

एकनाथ पाटील - कोल्हापूर -राज्यातील अतिरेकी कारवाया, उजळाईवाडी येथील गावठी बॉम्बस्फोट, कागलमध्ये सापडलेले बॉम्ब, त्याचबरोबर जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, शहराची सुरक्षा अस्थिर बनली आहे. औद्योगिकरणाचे जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यापुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षेसाठी सुमारे तीन कोटींचा नियोजित सीसीटीव्हीचा प्रस्ताव मार्गी लावण्याची गरज असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा आघाडी सरकारने केली होती. त्यानंतर त्याचा कोणीच पाठपुरावा केला नाही. महापालिकास्तरावर दोन कोटी व नियोजन समिती स्तरावर एक कोटी, असा सुमारे तीन कोटींचा हा प्रस्ताव आहे. पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील यांनी येत्या २३ जानेवारीला होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये कोल्हापूरच्या सुरक्षेसाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन रखडलेला प्रस्ताव मार्गी लावावा, अशी कोल्हापूरवासीयांच्यातून मागणी होत आहे.
शहरात लूटमार, महिलांचे चेन स्नॅचिंग, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना ठरावीक ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळवावे लागते. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन सुरक्षेसाठी चौका-चौकांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. सुमारे तीन कोटींचा निधी उपलब्ध करण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यानुसार मुंबईच्या एका कंपनीने संपूर्ण शहराचा सर्व्हे केला. अंतिम टप्प्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळणार इतक्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि हा प्रस्ताव रखडला.

‘सीसीटीव्ही’ची उपयोगिता...
मुंबईच्या कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये तावडे हॉटेल, कळंबा, फुलेवाडी जकात नाका, शिवाजी पूल, कसबा बावडा, आदी शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावरून मध्यवर्ती बसस्थानक, चिमासाहेब चौक, शिवाजी पूल, बिंदू चौक, संभाजीनगर, सायबर चौक, रंकाळा तलाव परिसर या ठिकाणी प्रामुख्याने सीसीटीव्ही बसविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवता येणार आहे. शहरात आलेले वाहन किती वेळाने बाहेर गेले. तसेच महिन्यातून ते वाहन किती वेळा शहरात आले याची माहिती ठेवणे सहज शक्य होणार आहे. अतिरेकी, दहशतवादी अथवा घुसखोरी करणाऱ्या लोकांचा वावर शहरात आहे का ? याची माहिती मिळणार, तसेच गुन्हेगारी कमी होण्यास मदत होऊन चोऱ्या, लुटमारीतील संशयित आरोपींना पकडणे सोपे जाणार आहे.