उजळाईवाडीत दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST2021-05-21T04:26:17+5:302021-05-21T04:26:17+5:30

उचगाव : कांजारभाट वसाहत, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील बेकायदा गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी छापा ...

Print at a liquor den in Ujlaiwadi | उजळाईवाडीत दारू अड्ड्यावर छापा

उजळाईवाडीत दारू अड्ड्यावर छापा

उचगाव : कांजारभाट वसाहत, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील बेकायदा गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी छापा टाकून ७८ हजार रुपयाचे साहित्य जप्त केले. उजळाईवाडी येथे कंजारभाट वसाहतीत गोकुळ शिरगाव पोलिसांनी छापा टाकला

यामध्ये पत्र्याचे प्लास्टिकचे बॅरेल, रसायन २० लिटर, हातभट्टीची दारू, पत्र्याचे शेड, भट्टी, पाणी साठविण्याचा सिमेंटचा हौद व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सतीश जनार्दन गुमाने, गोपाळ बाळू अभंगे, प्रशांत बबन गुमाने, निशांत महिपाल नेतले (सर्व रा. कंजारभाट वसाहत, उजळाईवाडी) यांच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, सर्व संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सनदी करीत आहेत.

Web Title: Print at a liquor den in Ujlaiwadi