शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

दादांच्या निवासस्थानावर जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांना रोखले

By admin | Updated: October 17, 2016 01:09 IST

‘भारत अगेन्स्ट करप्शन’तर्फे आंदोलन : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत

कोल्हापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.)चे दाखले मिळावेत, या मागणीसह मराठा समाजाला आरक्षण मिळावे, उसाला ‘एमआरपी’ मिळावी, आदी मागण्यांसाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’तर्फे रविवारी कोल्हापुरात महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानाकडे जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांना जुना राजवाडा पोलिसांनी रोखले. सुभाष रोडवरील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सर्व आंदोलक जमले होते; पण मोर्चा काढण्यापूर्वी आंदोलकांना याठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतले. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी मुंबईत एक आॅगस्ट २०१६ रोजी विधानभवनावर जेल भरो मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी शिष्टमंडळास मध्यस्थी करून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा व सकारात्मक निर्णय घेण्यासाठी चार दिवसांत बैठक लावतो, असे आश्वासन दिले होते. पण, तीन महिने होऊनही पालकमंत्री पाटील यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.)चे दाखले देण्याचे अधिकार महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना देण्यात यावेत, या मागणीसाठी रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संभाजीनगर, नाळे कॉलनीतील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार होता. त्यासाठी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण सुभाष रोडवरील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सर्व आंदोलक जमले. या ठिकाणी त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी करून धनगर समाजाला त्वरित अनुसूचित जमातीचे दाखले मिळावेत, अशी मागणी केली. यावेळी मोर्चा काढण्यापूर्वी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. थोड्या वेळाने आंदोलकांना सोडून दिले. आंदोलनात राज्य अध्यक्ष संतोष बिसुरे, राजूभाई पंजाबी, राहुल जैन, अशोक लिपारे, संजय बाबर , दस्तगीर आगा, प्रकाश काळे (कऱ्हाड तालुका), सातारा महिला जिल्हाध्यक्ष कुसुम शेवाळे, सुनीता कांबरे, बानू काझी, कुमार डोईफोडे, सतीश घाटगे, उमेश माटुंगे, आदींचा सहभाग होता.