शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांत पूर्ववैमनस्यातून जोरदार हाणामारी

By admin | Updated: September 20, 2015 01:56 IST

दोघे गंभीर : पोलिसांचा लाठीमार; पूर्ववैमनस्यातून घटना

मुरगूड : शहरातील मध्यभागी असणाऱ्या साळोखे गल्लीमध्ये दोन गटांत पूर्ववैमनस्यातून जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मुरगूड पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविल्याने अनर्थ टळला. रात्री साडेदहा वाजता ही हाणामारी झाली. रात्री उशिरापर्यंत तुकाराम चौक, जमादार चौक व साळोखे गल्लीमध्ये प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिसरातील वातावरण प्रचंड तणावाखाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साळोखे गल्लीमध्ये पाटील गट व जमादार गट असे गट आहेत. दोन महिन्यांपूर्वी येथील एका युवकाने मुरगूडमधील काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. त्यावेळी किरकोळ वाद झाला होता. त्यावेळेपासून आजपर्यंत जमादार गटाच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी त्यातील एका कार्यकर्त्याने चप्पल दाखवल्याच्या कारणावरून या दोन गटांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव बघता बघता जमल्याने वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले. या हाणामारीत दोन्ही गटांच्या काही कार्यकर्त्यांना गंभीर जखमा झाल्या. ही घटना पेट्रोलिंगला असणाऱ्या कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यास कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत मस्के तत्काळ प्रचंड फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले. सुरुवातीला त्यांनी दोन्ही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना समजावून सांगितले, पण कोणीच ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांनी बळाचा वापर क रीत सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमाव पांगला. या मारामारीत कोण व किती जखमी झाले याची माहिती अद्याप समजू शकली नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी जादा कुमक मागवून साळोखे गल्लीमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शहरामध्ये गटागटाने तरुण जमून या घटनेची माहिती घेत होते. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना सक्त ताकीद देऊन जमाव जमवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दरम्यान हा वाद उफाळल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)