शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Mayor: इचलकरंजीच्या महापौरपदासाठी प्रदीप धुत्रे, उदय धातुंडे आघाडीवर; उद्या अंतिम नावे होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:32 IST

उपमहापौरसह सभापतीसाठी आज चर्चा 

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेचा पहिला महापौर ठरविण्यासाठी बुधवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सात नावांवर चर्चा झाली. त्यापैकी हाळवणकर गटाकडून प्रदीप धुत्रे आणि आवाडे गटाकडून उदय धातुंडे यांची नावे आघाडीवर आहेत.

त्यावर एकमत होत नसल्याने आज, गुरुवारी पुन्हा चर्चा करून उपमहापौर आणि विविध समित्यांचे सभापती निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता सर्वांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यामध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे शहरवासीयांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक झाली. त्यामुळे पहिला महापौरपदाचा मान मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षण असल्याने कोणाची वर्णी लागणार, याबाबत पंचक्रोशीसह राजकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. सर्वाधिक ४३ जागा जिंकलेल्या भाजपमध्ये पहिला मान मिळविण्यासाठी अधिकजणांकडून मागणी आहे.

त्यामध्ये आवाडे आणि हाळवणकर गटातील नावांबाबत चर्चा करून एकमत करण्यासाठी मंत्री पाटील यांनी मिरज शासकीय विश्रामगृहात बुधवारी बैठक घेतली. बैठकीस आमदार राहुल आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

त्यामध्ये प्रदीप धुत्रे, उदय धातुंडे, तानाजी पोवार, नितेश पोवार, राजू बोंद्रे, सुशांत कलागते आणि रूपा बुगड यांच्या नावांबाबत चर्चा झाली. चर्चेतून धातुंडे आणि धुत्रे यांची नावे आघाडीवर आल्याचे समजते. त्यातील पहिला मान कोणाला द्यावा, याबाबत आवाडे आणि हाळवणकर गटात एकमत न झाल्याने या दोन्ही नावांबाबत प्रदेश समितीसोबत चर्चा करण्यासह गुरुवारी उपमहापौर आणि विविध समित्यांच्या सभापतींबाबत चर्चा करून अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे शुक्रवारीच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. घोषणेनंतर अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली असून, कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होतो, याकडे लक्ष लागले आहे.

शिव-शाहूकडून सयाजी चव्हाण

शिव-शाहू आघाडीकडून महापौरपदासाठी सयाजी चव्हाण यांचे नाव निश्चित, तर उपमहापौरपदासाठी संगीता आलासे आणि रूपाली कोकणे यांची नावे चर्चेत आहेत.

आजतागायत फक्त २ अर्ज

शिव-शाहूने बुधवारी दोन उमेदवारी अर्ज नेले आहेत. अर्ज देणे व भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजतागायत फक्त दोनच अर्ज नेण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Mayor Race: Dhutre, Dhatunde Lead; Names to be Announced

Web Summary : Pradeep Dhutre and Uday Dhatunde are frontrunners for Ichalkaranji's mayor post. Final names will be announced Friday after discussions on deputy mayor and committee heads. Shiv-Shahu names Sayaji Chavan for mayor.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौरBJPभाजपा