शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉप्युलर स्टील’चे दिलीप जाधव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:55 IST

शेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पॉप्युलर स्टील वर्कस‌् या कंपनीचे चेअरमन दिलीपराव केशवराव जाधव यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.

ठळक मुद्दे‘पॉप्युलर स्टील’चे दिलीप जाधव यांचे निधनशेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक

कोल्हापूर : शेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पॉप्युलर स्टील वर्कस् या कंपनीचे चेअरमन दिलीपराव केशवराव जाधव यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.गेले दोन दिवस दिलिपराव यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे त्यांचे बंधू कार्यकारी संचालक राजेंद्र उर्फ राजू जाधव, पत्नी, दोन मुले भूषण आणि युवराज, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंगभूत ज्ञान, प्रचंड निरक्षण क्षमता, कल्पकता आणि दूरदृष्टी याच्या जोरावर पॉप्युलर स्टीलला देशपातळीवर नावलौकिक मिळवून देण्याचे काम जाधव यांनी केले. त्यांच्या निधनाने एक कुशल आणि यशस्वी उद्योजकास कोल्हापूरची उद्यमनगरी मुकली आहे, अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.धार्मिक प्रवृत्ती आणि अतिशय विनम्र स्वभावाच्या दिलिपरावांनी समाजातील विविध घटकांविषयी आपुलकी जोपासली आहे. शहरात कोठेही महाप्रसाद असला की त्यामध्ये पॉप्युलरची मदत असतेच. कोल्हापूरच्या स्मशानभूमीचे विस्तारीकरण दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम दिलिपरावांनी सातत्याने दहा वर्षे केले आहे.दिलिप जाधव यांना अनेक संस्थांनी पुरस्काराने सन्मानित केले आहे. १९९५ मध्ये इमेन-मेक्सिको (अमेरिका) चा इंटरनॅशनल डायमंड स्टार फॉर क्वालिटी अ‍ॅवार्ड १९९६ मध्ये आॅल इंडिया आॅर्गनायझेशन इंटर प्रिनीरेअल कॉन्फीडरनेशन (नवी दिल्ली)चा आर्च आॅफ एक्सलंट अ‍ॅवार्ड, बिझनेस इनिशिएटिव्ह डेव्हलपमेंट बोर्ड (नवी दिल्ली)चा बिझनेस डेव्हलपमेंट अ‍ॅवार्ड, इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशीप सोसायटीचा भारत गौरव अ‍ॅवार्ड, इन्स्टिट्यूट आॅफ इकॉनॉमिक स्टडीजचा उद्योगरत्न अ‍ॅवार्ड, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, स्मॅक व गोशिमा या संस्थांचा गुणी उद्योजक, आॅल इंडिया चेंबर आॅफ कॉमर्स, मुंबईचा उद्योगश्री, कोल्हापूर महानगरपालिकेचा कोल्हापूर भूषण आदी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर