शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

वळीवडेच्या सुर्वे बंधाऱ्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST

गांधीनगर : वळीवडेसह आसपासच्या अनेक गावांची तहान भागवत शेतशिवार समृध्द करणाऱ्या पंचगंगा नदीवरील सुर्वे बंधाऱ्याची सध्या दुरवस्था झाली आहे.बंधाऱ्यावरील ...

गांधीनगर : वळीवडेसह आसपासच्या अनेक गावांची तहान भागवत शेतशिवार समृध्द करणाऱ्या पंचगंगा नदीवरील सुर्वे बंधाऱ्याची सध्या दुरवस्था झाली आहे.बंधाऱ्यावरील सिमेंट काँक्रिटचा रस्ता खराब झाला असून त्यावरील संरक्षक कठड्याची पडझड झाल्याने हा बंधारा असुरक्षित बनला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची दुुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे वळीवडे, हालोंडी, हेरले, शिरोली गावचे शिवार हिरवेगार व समृद्ध झाले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. या बंधार्‍यावरून नदीपलीकडील वळीवडे ते हेरले, हालोंडी, शिरोली या गावांच्या हद्दीत शेतकऱ्यांची शेती आहे. ती कसण्यासाठी व इतर कामासाठी या बंधाऱ्यावरुनच जावे लागते. मात्र, बंधाऱ्यावरील रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत. बंधाऱ्यावरील सिमेंट काँक्रिट पुराच्या पाण्याने वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना‍ बंधाऱ्यावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. अनेकवेळा बंधार्‍यावरून ये-जा करत असताना दुर्घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या बंधार्‍याची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. बंधाऱ्याचे भवितव्य टिकविण्यासाठी पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यावर योग्य त्या उपाययोजना करून तो सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट 1) वळीवडेसह इतर गावांसाठी दुवा असणारा सुर्वे बंधारा हा ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय व शेती सिंचनासाठी बांधण्यात आला. संबंधित पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याची पाहणी करून तो मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत याकामी योग्य तो पाठपुरावा प्रशासनाकडे करून बंधाऱ्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रयत्न करू.

- सरपंच - अनिल पंढरे

चौकट 2)

छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टी ठेवून सुर्वे बंधाऱ्याची उभारणी केली. अनेक गावांची तहान भागवत असलेल्या व समृद्ध शेतीसाठी योगदान देणाऱ्या या बंधाऱ्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने या बंधाऱ्याकडे लक्ष देऊन त्याची सुरक्षितता जपावी.

- ग्रा.पं. सदस्य - भगवान पळसे.

चौकट 3)

सुर्वे बंधाऱ्याबाबत पाणी पातळी वा सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी ऑफिसकडे आलेल्या नाहीत. पण बंधाऱ्याच्या सुरक्षेबाबत तक्रारी असतील, तर योग्य तो सर्व्हे करून ताबडतोब दुरुस्तीसाठी प्रयत्न करू.

- शाखा अभियंता पाटबंधारे विभाग - उत्तम मोहिते.

फोटो ओळ-

वळीवडे येथील सुर्वे बंधाऱ्याची झालेली दुरवस्था व जीवघेणी वाहतूक. (छाया : बाबासाहेब नेर्ले.)