शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी’साठी २७ डिसेंबरला मतदान

By admin | Updated: November 21, 2015 00:39 IST

राजकीय घडामोडींना वेग : सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यासाठी २७ डिसेंबरला मतदान होणार आहे. प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली असून सोमवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून ३० नोव्हेंबरला छाननी होणार आहे; तर १५ डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. ‘कुंभी’ची निवडणूक जाहीर झाल्याने करवीर, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपलेली आहे; पण राज्य सरकारने या ना त्या कारणाने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकली होती. विरोधी आघाडीने निवडणुकीचा रेटा लावल्यानंतर मे-जून महिन्यांत मतदार यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १९ जूनला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच निवडणूक होईल, असे अपेक्षित होते; पण सत्तारूढ गटाने पावसाळ्याचे दिवस असल्याने निवडणुकीला स्थगिती मिळविली होती. राज्य सरकारने राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका आॅक्टोबरपर्यंत स्थगित केल्या होत्या. स्थगिती संपून २० दिवस झाले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नसल्याने प्रमुख राजकीय मंडळी संपर्कात होती. प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठविला होता. त्याला गुरुवारी मंजुरी मिळाली. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ‘कुंभी’च्या राजकारणात नरके यांच्याविरोधात राजर्षी शाहू आघाडी असाच सामना रंगला आहे. मध्यंतरीचा अपवाद वगळता कारखान्यावर आमदार चंद्रदीप नरके यांनी आपले वर्चस्व राखले आहे. सभासदांनी पाच वर्षे नरके घराण्याला बाजूला ठेवत कारखान्याची सत्ता राजर्षी शाहू आघाडीच्या हातात दिली होती; पण पाच वर्षांत पाच अध्यक्षांचा कारभार पाहून सभासदांनी पुन्हा गेली दहा वर्षे नरके घराण्यावरच विश्वास दाखविला आहे. आता आमदार नरके यांच्याविरोधात शाहू आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आघाडीचे नेतृत्व ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, यशवंत बॅँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश देसाई व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील हे करीत आहेत; पण ‘कुंभी बचाव मंच’च्या माध्यमातून बाजीराव खाडे यांनी गेली दीड-दोन वर्षे कार्यक्षेत्रात सर्वपक्षीय स्वतंत्र मोट बांधली आहे. जिल्हा बॅँकेचे माजी संचालक संदीप नरके यांनीही ‘एक व्यक्ती, एक पद’ हा नारा देत ‘कुंभी’च्या राजकारणात उडी घेतली आहे. त्यांची आतापर्यंतची भूमिका पाहता ते थेट नरके घराण्याविरोधात रिंगणात उतरण्याची शक्यता धूसर आहे. (प्रतिनिधी)दुरंगी लढत होणारराजर्षी शाहू आघाडी व कुंभी बचाव मंच यांनी स्वतंत्र तयारी केली असली तरी दोन्हीही आघाड्या माजी आमदार पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. त्यामुळे विरोधक विस्कळीत वाटत असले तरी शेवटच्या क्षणी एकत्र येऊन ते तगडे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. त्यामुळे नरके पॅनेल व विरोधी आघाडी असाच दुरंगी सामना होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकारी बदलणार?निवडणूक प्राधिकरणाने ‘कुंभी’च्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (नरेगा) विद्युत वरखेडकर यांची नियुक्ती केली आहे; पण गेले महिनाभर महापालिका निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी बदलण्याची शक्यता आहे. अशा आहेत जागागटजागागट - १ ३गट - २४गट - ३३गट - ४३गट - ५३अनुसूचित जाती१महिला प्रतिनिधी२इतर मागासवर्गीय१भटक्या विमुक्त जाती१ असा आहे निवडणूक कार्यक्रमअर्ज दाखल करण्याची मुदत- २३ ते २७ नोव्हेंबर दाखल अर्जांची छाननी- ३० नोव्हेंबर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध- १ डिसेंबरमाघारीची मुदत- १५ डिसेंबरपर्यंतमतदान- २७ डिसेंबर मतमोजणी- २९ डिसेंबर