शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी पोलीसदल सज्ज

By admin | Updated: November 1, 2015 00:31 IST

शहरात सशस्त्र पहारा : वाहतूक मार्गांत बदल

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या उद्या, सोमवारी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात सर्वत्र कडेकोट सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शनिवारी दिली. दरम्यान, मतमोजणी मार्गांवर बंदोबस्तात असलेली पोलीस वाहने, अग्निशामक दल, शासकीय वाहने, रुग्णवाहिका, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली पासधारक वाहने वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. उद्या पहाटे पाचपासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. वळविण्यात आलेले मार्ग राष्ट्रीय महामार्गावरून शाहू जकात नाक्यामार्गे शहराकडे जाणारी सर्व प्रकारची मोटार वाहने ही राष्ट्रीय महामार्ग उचगाव, तावडे हॉटेलमार्गे मार्गस्थ होतील. शहरातून सायबर चौकमार्गे शाहू जकात नाक्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने सायबर चौक, एस. एस. सी. बोर्ड, राजेंद्रनगरमार्गे शाहू जकात नाक्याकडे जातील. इंदिरासागर हॉल (संभाजीनगर)कडून सायबर चौकामार्गे महामार्गाकडे जाणारी सर्व वाहने ध्यानचंद हॉकी स्टेडियम, शेंडा पार्क, आर. के. नगर, शांतिनिकेतन विद्यालयमार्गे शाहू जकात नाक्याकडे जातील. राजारामपुरी परिसरातून ताराराणी चौकाकडे ये-जा करण्यासाठी वाहनचालकांनी टाकाळा चौक, रेल्वे फाटकमार्गे अवलंब करावा. सरनोबतवाडी जकात नाकामार्गे शहरात येणाऱ्या वाहनांनी उचगाव, तावडे हॉटेलमार्गे मार्गस्थ व्हावे. ताराराणी चौकाकडून रेल्वे उड्डाणपूलमार्गे महामार्गाकडे जाणारी सर्व वाहने लिशा हॉटेल सिग्नल चौक, मुक्त सैनिक वसाहत, शिरोली जकात नाका, तावडे हॉटेलमार्गे जातील. (प्रतिनिधी) लोकांनी दिलेल्या मतांचा कौल सर्वांनी स्वीकारावा. कोणीही कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नये. घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक)