शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

प्रीमियर लीगसाठी खेळाडू सज्ज

By admin | Updated: January 13, 2015 00:06 IST

पहिलीच स्पर्धा : शैबाज पठाणवर सर्वाधिक बोली, चेंडूचे अनावरण

राजापूर : आयपीएल क्रिकेटस्पर्धेच्या धर्तीवर राजापुरात प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या राजापूर अंडरआर्म प्रीमिअर लीगच्या लोगोचे व स्पर्धेतील चेंडूचे अनावरण आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा लिलाव रविवारी राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात पार पडला. लिलावामध्ये सर्वाधिक बोली राजापुरातीलच शैबाज पठाणवर लागली. त्याला राजापूर रॉयल्सने ८ हजार रूपयांना विकत घेतले.
लिलाव झालेल्या सर्व खेळाडूंशी दोन वर्षांचा करार केला जाणार असून, हा करार त्यांचेवर बंधनकारक राहणार आहे. आता दि. २४ ते २६ जानेवारी २०१५ या कालावधीत शहरातील कै. द. ज. सरदेशपांडे खुल्या नाट्यगृहाच्या जागेत प्रकाशझोतातील क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे.
राजापूर हायस्कूलच्या कलामंदिर सभागृहात व्यंकटेश तानवडे व शर्मद, अ‍ॅड. शशिकांत सुतार यांच्या हस्ते लोगोचे अनावरण, तर राजापूर तालुका प्रेस कलबचे सल्लागार महेश शिवलकर यांच्याहस्ते चेंडूचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ११९ खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील खेळाडूंचा समावेश होता. राजापुरातील शैबाज पठाण याने बाजी मारली. त्याला ८ हजार रूपयांना प्रवीण तोरस्कर मालक असलेल्या राजापूर रॉयल्स संघाने विकत घेतले. याशिवाय नितिश कुडाळी, प्रथमेश सूद, निनाद शिर्सेकर, वैभव चव्हाण, मुनसिब मुल्ला, समीर नवाळे, वैभव नागवेकर, अशपाक गडकरी, संकेत गुरव, रविश सय्यद आदी खेळाडूंसाठीही बोली लावण्यात आली.
यावेळी सहयोग असोसिएटसचे व्यंकटेश तानवडे, शर्मद, राजापूरचे कार्याध्यक्ष अड. शशिकांत सुतार, राजापूर तालुका प्रेस कलबचे सल्लागार महेश शिवलकर, अध्यक्ष सुंदर पाटणकर तसेच नगरसेवक संजय ओगल, रवींद्र बावधनकर, हनिफ मुसा काझी आरयुपीएलचे संयोजक स्वप्नील गोठणकर, नीलेश रहाटे, महेश मणचेकर, सुबोध बाकाळकर, जगदीश ठोसर, सचिन अणसुरकर, दिनेश पवार, निलेश खानविलकर, सुशील टिळेकर, राजन करंगुटकर, परेश शिंदे, विनायक जोगले, सुनील जाधव, माधव चव्हाण, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन स्वप्नील गोठणकर, प्रास्ताविक संजय मांडवकर यांनी केले. लिलाव पुकारणी जितेंद्र मालपेकर यांनी केली. दि. २४ ते २६ जानेवारी २०१५ या कालावधीत शहरातील कै. द. ज. सरदेशपांडे खुल्या नाट्यगृहाच्या जागेत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. तालुक्यातील शौकिनांसाठी ही पर्वणी आहे. (प्रतिनिधी)

सर्वाधिक बोली मिळालेले पहिले पाच खेळाडू - शैबाज पठाण, राजापूर (८ हजार रूपये) राजापूर रायल्स, मंदार सनगरे, रत्नागिरी (६ हजार रूपये) राजापूर लायन्स, नितिश कुडाळी, राजापूर (६ हजार रूपये) राजापूर नाईट रायडर्स, प्रथमेश सूद, राजापूर (५ हजार ३०० रूपये) राजापूर फिनिक्स, अमर भोंगाळे, चिपळूण (५ हजार रुपये) राजापूर रॉक्स.


संघाचे नावसंघमालकांचे नाव
राजापूर इंडियन्सरवींद्र बावधनकर
राजापूर फिनीक्सतुकाराम गुरव
राजापूर लायन्ससंजय दुधवडकर
राजापूर नाईट रायडर्सहनिफ मुसा काझी
राजापूर रॉक्ससुशांत मराठे
राजापूर ब्रिगेडिअर्सअझिम चौगुले
राजापूर टायगर्सविनय गुरव
राजापूर रॉयल्सप्रवीण तोरस्कर


आयपीएलच्या धर्तीवर राजापुरात प्रथमच स्पर्धा.
कलामंदिर सभागृहात खेळाडूंसाठी लिलाव.
११९ खेळाडूंचा लिलाव.
२४ ते २६ जानेवारी दरम्यान स्पर्धा रंगणार.
महासंग्रामासाठी राजापूर सज्ज.
सर्वत्र उत्साह.