शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्लँचेट - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

- मोहन रावळ ए-२, ७०२, राजयोग काॅलनी रेणुका वृंदावन अपार्टमेंट, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड-पुणे ३३ डाॅ. मंडले आपली ड्युटी ...

- मोहन रावळ

ए-२, ७०२, राजयोग काॅलनी रेणुका वृंदावन अपार्टमेंट, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवड-पुणे ३३

डाॅ. मंडले आपली ड्युटी संपवून रात्री ८ वाजता घरी जाण्याच्या तयारीला लागले. त्यांनी स्टेथोस्कोप ड्राॅव्हरमध्ये ठेवला व ड्राॅव्हरमधील मोबाईल खिशात ठेवला. अंगावरील ॲप्रन उतरवून हातात घेतला. कपडे झटकले आणि रूमच्या बाहेर आले. ते हेडनर्स सायलीला म्हणाले, “सायली मॅडम, काही अर्जंट असेल तर फोन करा, मी घरीच आहे. त्या अठ्ठावीस नंबरच्या बेडवरील पेशंटकडे जरा लक्ष द्या. सिरीयस वाटतो.’

‘मी लक्ष ठेवते. माझी रात्री बारापर्यंत ड्युटी आहे. त्यानंतर बुरटे मॅडम असतील.’

‘ठीक आहे. त्यांना त्या पेशंटची कल्पना द्या. विसरू नका.’

‘आठवणीने सांगते.’ म्हणत सायली वाॅर्डमध्ये सलाईनची बाटली घेऊन गेली. डाॅ. मंदले तिसऱ्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी लिफ्टकडे आले. लिफ्टचे बटण दाबून ते थांबले. अठ्ठावीस नंबरच्या बेडवरच्या पेशंटचे नाव राजा साळंबे होते. त्याला रक्ताच्या उलट्या होत होत्या. फुप्फुसाचा कॅन्सर बळावला होता. डाॅक्टर मंडलेंनी त्याच्यावर उपचार केले होते.

लिफ्ट आली. डाॅ. मंडले आत शिरले आणि लिफ्टचे दार बंद होत असतानाच एक हात पुढे आला. दार पुन्हा उघडले गेले. समोर तो सिरीयस पेशंट राजा साळंबे उभा होता. तो आता टवटवीत वाटत होता. डाॅ. मंडले क्षणभर चक्रावले. ‘तू अठ्ठावीस नंबरवरचा राजा साळंबे ना?’ डाॅ. मंडलेंनी विचारले.

‘हो’ ओठाशी आलेलं रक्त रूमालानं पुसत राजा म्हणाला.

‘तुला असं जाता येणार नाही.’

‘आता मला कुणी अडवू शकणार नाही.’ राजा कसानुसा हसला.

डाॅ. मंडले लिफ्टमधून त्याच्या पुढे आले आणि गेटवरच्या दरबानला म्हणाले, ‘दरबान किसी भी पेशंट को बाहर मत छोडो.’

‘नही साब!’ दरबान सॅल्युट करून म्हणाला, ‘डाॅ. मंडले पार्किंगमध्ये आले आणि आपल्या कारमध्ये बसून ते घराकडे निघाले. राजा तेथून नाहीसा झाला होता. घरी पोहोचून डाॅक्टरांना अर्धाच तास झाला होता. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजू लागली. डाॅक्टरांनी फोन उचलला. पलीकडून सायली हेडनर्स बाेलत होती. ‘डाॅक्टर तो अठ्ठावीस नंबरवरचा पेशंट राजा साळंबे तुम्ही असतानाच मेला होता. त्याला रक्ताची मोठी गुळणी आली होती. तो झोपलाय असं समजून आपण लक्ष दिलं नाही. आता त्याच्या खिशातला फोन वाजत राहिला म्हणून माझं लक्ष गेलं. तो संपलाय सर. तुम्ही येता का चेकिंगला?’

‘येतो, अर्ध्या तासात. आता ट्रॅफिक जाम असेल. थोडा तरी वेळ लागणारच!’ म्हणत डाॅक्टरांनी फोन बंद केला.

डाॅ. मंडले थोडे वैतागलेच होते. त्यांनी अर्ध्या तासात दवाखाना गाठला व थेट अठ्ठावीस नंबरच्या बेडजवळ आले. त्यांनी राजाच्या प्रेताला तपासले. ते कलेवर थंड पडले होते. तोंडातून आलेले रक्त साकळून काळे पडले होते. डाॅ. वाॅर्डबाॅयला म्हणाले, ‘सावंत याचं तोंड पूस. मी याच्या घरच्यांना फोन लावतो.’

डाॅ. मंडले त्यांच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी काळजीपूर्वक डेथ सर्टिफिकेट लिहिले. मृत्यूचं कारण फुप्फुसाचा कॅन्सर लिहून पेशंटला स्मोकिंगची सवय होती असं नमूद केलं. डेथ सर्टिफिकेटवर शिक्का मारून सही केली. एवढ्यात सायली मॅडम आली. तिच्या हातात हाॅस्पिटलचे बिल होते. ‘सर, या बिलावरही सही करा.’ सायली म्हणाली.

‘किती बिल झालंय.’

‘अठ्ठावीस हजार. त्याला तीन दिवस आयसीयूमध्ये ठेवलं होतं. शिवाय काही इंजेक्शन्स, औषधं आपल्या हाॅस्पिटलची दिली होती.’

‘बिल योग्य आहे ना?’

‘हो सर!’

डाॅक्टरांनी बिलावर सही केली आणि सायलीला म्हणाले, ‘प्रेत रबरी पिशवीत ठेवा. मी पेशंटच्या घरच्यांना कळवतो.’

‘दोन दिवसांत राजा साळंबेच्या घरून कोणी आलंही नाही.’

‘ते ओळखून होतेच. असो, मी फोन करतो.’ म्हणताच सायली बिलाचे पॅड घेऊन गेली. डाॅक्टरांनी मोबाईलवर राजाच्या घरी फोन लावला. घड्याळात रात्रीचे दहा वाजत आले होते.

‘हॅलो, मी मानवता हाॅस्पिटलमधून डाॅ. मंडले बोलतोय.’

‘बोला डाॅक्टर. मी राजाचा वडील बोलतोय.’

‘सांगायला वाईट वाटतंय. राजाचे देहावसान झालेय.’

‘केव्हा?’

‘दोन-अडीच तासांपूर्वी, गेल्या दोन दिवसांत त्याला भेटाया कोणीही तुमच्या घरून आलं नाही.’

‘शेतीची कामं चालली होती. मजुरीला माणसं मिळत नाहीत. तुम्ही म्हणताय राजा दोन-अडीच तासांपूर्वी वारला. पण तो तर तासापूर्वी घरी येऊन गेला. कुणाशीच बोलला नाही. त्याला पाहून त्याची बायको चहा टाकायला स्वयंपाक घरात गेली तोवर तो न सांगता निघून गेला.’

‘कसं शक्य आहे?’

‘तेच म्हणतोय मी. त्याची बाॅडी लवकर उचला. बाकीच्या पेशंटच्या मनावर दडपण येतंय.’

‘डाॅक्टर! राजा होताच अवगुणी. काही कामाचा नव्हता. सिगरेटी फुकत दारू पिऊन गावात न् घरात नुसता गोंधळ घालायचा. मेला हेच बरं झालं.’

‘तुमचं ठीक आहे हो. त्याची बाॅडी उचला.’

‘करतो काय तरी सोय. आंबुलन्स भेटते का बघतो.’ म्हणत राजाच्या वडिलांनी फोन बंद केला.

डाॅक्टरांनी सायली मॅडमला वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि ते घराकडे मोटारीने निघाले. त्यांच्या डोक्यात गिरमिट फिरू लागलं. राजा मेला इथं. मग घरी कसा गेला? का त्याचा बाप हूल देतोय. राजा मलाही लिफ्टमध्ये दिसला होता...

राजाच्या वडिलांनी व भावाने दवाखान्याचे बिल भागवून प्रेत ॲम्ब्युलन्समधून नेले होते. त्यावेळी रात्रीचे बारा वाजले होते. सायली मॅडमने रक्कम घेऊन रोखीची पावती राजाच्या वडिलांकडे दिली होती व डेथ सर्टिफिकेटही त्यांना दिले होते. मग सायली घरी गेली होती.

रात्रपाळीला बुरटे मॅडम, अंजली नावाची नर्स, वाॅर्डबाॅय राॅड्रीग व शांताराम आले होते. आता हाॅस्पिटल या चौघांच्या देखरेखीत राहणार होतं. त्यांनी सर्व पेशंट मोजून पाहिले व झाडलोट केली.