शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

‘वसुंधरा महोत्सवा’त प्लास्टिकमुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:40 IST

महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील फोटो ,कागदी-कापडी पिशव्या आणि पर्यावरणपूरक खेळणी यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्लास्टिक पिशवीत अडकलेली पृथ्वी पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते मुक्त करून  दहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले.  ‘वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर' या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला.

ठळक मुद्दे‘वसुंधरा महोत्सवा’त प्लास्टिकमुक्तीचा संदेश ‘वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर' या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा

कोल्हापूर : महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील फोटो ,कागदी-कापडी पिशव्या आणि पर्यावरणपूरक खेळणी यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्लास्टिक पिशवीत अडकलेली पृथ्वी पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते मुक्त करून  दहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले.  ‘वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर' या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला.शाहू स्मारक भवनात प्राचार्य अजेय दळवी, वीरेंद्र चित्राव, धीरज जाधव, विजय टिपुगडे, अनिल चौगुले, राहुल पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नंदकुमार गुरव यांनी बनवलेल्या ‘प्लास्टिक बंदी आणि वापर’ या विषयाचे सादरीकरण उदय गायकवाड यांनी केले. यात प्लास्टिक बंदीसंबंधीच्या कायद्यातील तरतुदी, मर्यादा आणि आपण करावयाची कृती या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

प्राचार्य अजेय दळवी यांनी महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. वीरेंद्र चित्राव यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर' या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला. त्यानंतर मिडवे, आइसलॅँड, गॅमो, द क्वीन आॅफ माउंटन्स, द रिटर्न आॅफ संगाई हे लघुपट दाखविण्यात आले.दिवसभरात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामध्ये ‘प्लास्टिक बंदी - पर्याय’ या विषयावर झालेल्या गटचर्चेमध्ये १०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशांत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रा. डॉ. पी. डी. राऊत, व्ही. एम. देशपांडे, राहुल पवार, उदय गायकवाड, अनिल चौगुले, आसावरी जाधव, पल्लवी भोसले उपस्थित होत्या.इको-फ्रेंडली सजावटमहोत्सवाच्या निमित्ताने शाहू स्मारक भवनच्या व्यासपीठासह पूर्ण परिसर इको-फ्रेंडली साहित्याने सजवण्यात आला होता. कागदी-कापडी पिशव्या, झाडू, बुट्टी, पत्रावळ्या, द्रोण, खराटा या साहित्याचा वापर करून ही सुरेख सजावट करण्यात आली होती. 

 

टॅग्स :environmentपर्यावरणcultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर