गडहिंग्लज पंचायत समितीची कामगिरी कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:33+5:302021-04-04T04:23:33+5:30

गडहिंग्लज : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण अभियानात गडहिंग्लज पंचायत समितीने ...

The performance of Gadhinglaj Panchayat Samiti is commendable | गडहिंग्लज पंचायत समितीची कामगिरी कौतुकास्पद

गडहिंग्लज पंचायत समितीची कामगिरी कौतुकास्पद

गडहिंग्लज : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज सशक्तीकरण अभियानात गडहिंग्लज पंचायत समितीने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती रूपाली गौतम कांबळे, उपसभापती ईराप्पा शंकर हसुरी, गटविकास अधिकारी शरद मगर, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांचा सत्कार झाला.

मुश्रीफ म्हणाले, या यशात पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी, गावागावांतील ग्रामपंचायती व ग्रामस्थांचेही मोठे योगदान आहे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील सातत्य त्यांनी यापुढेही कायम राखावे. गडहिंग्लज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील.

सभापती कांबळे म्हणाल्या, केंद्र व राज्य सरकारच्या विविध शासकीय व सामाजिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. गावागावांतील जनतेपर्यंत सर्व योजना पोहोचविण्यासाठी सर्वांनी मनापासून काम केले. पंचायत समितीचे पदाधिकारी, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्या संघटित कष्टाचे हे फळ आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व माजी सभापती अमर चव्हाण, प्रकाश पताडे, आनंदा पाटील, राहुल शिरकोळे, आदी उपस्थित होते. -

फोटो ओळी : गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती रूपाली कांबळे व उपसभापती ईरापा हसुरी व अधिकाऱ्यांचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सभापती अमर चव्हाण, प्रकाश पताडे, राहुल शिरकोळे, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०३०४२०२१-गड-०१

Web Title: The performance of Gadhinglaj Panchayat Samiti is commendable