शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसान- भरपाईत वाढ

By admin | Updated: January 13, 2015 00:10 IST

वनखात्याचा निर्णय : जंगलाशेजारील शेतकऱ्यांना दिलासा

वन्य जिवांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईत वन्यखात्याने वाढ केली असून शासनाने नुकसानभरपाईची रक्कम वाढवली आहे. यापूर्वी पिकाच्या नुकसानीस प्रतिगुंठा २० रुपये मदत करून शेतकऱ्यांची जणू चेष्टाच केली जात असे. त्यामुळे नुकसानीबाबत शासनाच्या नियामानुसार शेतकरी हतबल होत होते.
अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांद्वारे होणाऱ्या पिकांची नुकसानभरपाई वाढवावी, अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून केली जात होती. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि राधानगरी आदी तालुक्यात अशा वन्यप्राण्यांपासून शेतीचे अतोनात नुकसान होते, पण शेतकऱ्याच्या हाती तोकडी शासकीय मदत पडते. शासनाने आता रक्कम वाढवली असली तरी
याबाबत शेतकऱ्यांकडून पूर्वीपेक्षा बरी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याशिवाय नुकसान करणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आता माकड, गिधाड, गवा रेडा या प्राण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्राण्यांनी पिकांचे नुकसान
केल्यास वनखाते आर्थिक मदत करणार आहे.


नुकसान व त्याची भरपाई
२ हजारपर्यंत नुकसान झाल्यास : पूर्ण परंतु किमान रु. ५००
२ हजार ते १० हजारपर्यंत नुकसानीच्या ५० टक्के, कमाल सहा हजार रु.
१० हजारापेक्षा अधिक उसाचे नुकसान : नुकसानीच्या ३० टक्के,
कमाल १५ हजार रु. प्रति टन ४०० रु.
हल्ल्यातील जखमींना मदत : व्यक्ती मृत्यू पावल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास : २ लाख रुपये.
किरकोळ जखमी झाल्यास : रु. ५०,०००/-
किरकोळ जखमी : औषधोपचाराचा खर्च मिळणार, खासगी रुग्णालयात उपचार झाल्यास ७,५०० रु. देणार.


फळबागांच्या नुकसानीसाठी मदत : पूर्वी हत्तीपासून होणाऱ्या फळबागांच्या नुकसानीसाठी मदत मिळत होती. आता नव्याने रानगव्यांपासूनच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ती भरपाई प्रती झाड पुढीलप्रमाणे :
नारळ : २००० रु., सुपारी : १,२०० रु., कलमी आंबा : १,६०० रु.,
केळी : ४८ रु., इतर फळझाडे : २०० रु.