शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटबंधारे’चा लिपिक लाच घेताना जाळ्यात

By admin | Updated: June 14, 2014 01:25 IST

बदलीचा अर्ज पाठविण्यासाठी घेतली पाच हजार रुपयांची लाच

कोल्हापूर : बदलीचा अर्ज पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटबंधारे विभागातील कनिष्ठ लिपिक संशयित दिनकर अण्णाप्पा कांबळे (वय ५४, रा. वसगडे, ता. करवीर) याला आज- शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ताराबाई पार्क येथील सिंचन भवन पाटबंधारे विभागाच्या परिसरात पोलिसांनी केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बावडा येथे पाटबंधारे शाखेमध्ये कालवा निरीक्षक म्हणून संदीप मंचकराव अंभुरे (वय २४, रा. मूळ गाव परभणी) हे २० नोव्हेंबर २०११ पासून या ठिकाणी काम करतात. ते अपंग असून अपंग वर्गवारीमधून भरती झाले आहेत. १३ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी परभणी जिल्ह्णात बदली होण्यासाठी कोयना बांधकाम मंडळ व परिमंडळीय अधिकारी अधीक्षक अभियंता यांच्याकडे अर्ज करून त्याची पोहोच घेतली. त्यानंतर हा अर्ज पंचगंगा पाटबंधारे उपविभाग सहायक अभियंता (श्रेणी वर्ग) यांच्यामार्फत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविल्याचे अंभुरे यांना समजले. त्यांनी या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिनकर कांबळे यांची भेट घेतली. त्यावेळी कांबळे याने ‘तुझी फाईल माझ्याकडे आहे. तुझी बदली व्हावी, अशी शिफारस मी करीन. / पान ४ वरत्याकरिता पाच हजार रुपये दिले पाहिजेस.’ असे सांगितले. तेव्हा त्यांनी ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगितले. त्यावेळी ‘तू मला पैसे देत नाहीस तोपर्यंत तुझा अर्ज पुढे पाठवणार नाही,’ असे त्याने अंभुरे यांना सांगितले. त्यानंतर अनेक वेळा कांबळे यांना भेटून बदलीचा अर्ज पुढे पाठवा, अशी त्यांनी विनंती केली. परंतु, त्यांनी पैसे देत नाही तोपर्यंत अर्ज पुढे पाठवणार नाही, असे अंभुरे यांना सांगितले. त्यानंतर काल, गुरुवारी अंभुरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी पाटबंधारे विभाग येथे पाच हजारांची लाच स्वीकारताना संशयित दिनकर कांबळे याला पोलिसांनी सापळा रचून पकडले. दरम्यान, लाच घेतल्यानंतर पोलिसांचे पथक कांबळे याच्या वसगडेतील घराची झडती घेण्यासाठी रवाना झाले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उदयसिंह पाटील, पोलीस हवालदार श्रीधर सावंत, जितेंद्र शिंदे, दयानंद कडूकर, पावलेकर ,महिला पोलीस शिपाई अर्पिता चौधरी यांनी केली.साडेपाच महिन्यात ११ जण जाळ्यात...१ जानेवारी ते आज (शुक्रवार )अखेर लाचलुचपत विभागाने जिल्ह्यात ११ जणांना लाचप्रकरणी अटक केली आहे. त्यांमध्ये सर्वाधिक महसूल विभागातील पाच , पोलीस दल दोन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोल्हापूर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद (पीडब्ल्यूडी विभाग) यांतील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले.दरम्यान, लाचेच्या अथवा अपसंपदेच्या तक्रारी असल्यास त्यांनी लाचलुचपत विभाग कोल्हापूर ०२३१ -२५४०९८९ व ९४०४३४५५३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.