‘पॅकर्स’ची भिडे स्पोर्टस्‌ वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:12 IST2021-03-30T04:12:51+5:302021-03-30T04:12:51+5:30

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील मालती पाटील चषक क्रिकेट स्पर्धेत पॅकर्स क्रिकेट क्लबने भिडे ...

The Packers beat the crowd at Sports | ‘पॅकर्स’ची भिडे स्पोर्टस्‌ वर मात

‘पॅकर्स’ची भिडे स्पोर्टस्‌ वर मात

कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकोणीस वर्षाखालील मालती पाटील चषक क्रिकेट स्पर्धेत पॅकर्स क्रिकेट क्लबने भिडे स्पोर्टस्‌चा १०८ धावांनी पराभव केला.

शाहू क्रीडांगण, कागल येथे झालेल्या या सामन्यात पॅकर्स क्रिकेट संघाने ३८.४ षटकांत सर्वबाद २४७ धावा केल्या. यात आयुष करवळने ७५, आदित्य पिसाळने ५०, कार्तिक पाटीलने ३२, महादेव पवारने १८, प्रफुल्ल चव्हाणने १४ धावा केल्या. भिडे स्पोर्टस्‌कडून गोलंदाजी करताना कृष्णम झंवर, सुधांशू रसाळ, श्रीजित खमितकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. समरांग पाटील, अर्णव पाटील, सुमित कदम यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

उत्तरादाखल खेळताना भिडे स्पोर्टस्‌ संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना ३३.१ षटकांत सर्वबाद १३९ धावाच करता आल्या. त्यात आदित्य पाटीलने ४६, पियुष गायकवाड व सुमित कदम यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. पॅकर्सकडून शुभम कुरणेने भेदक गोलंदाजी करीत तीन, तर सुरेंद्र पाठक, आदित्य पिसाळ व कार्तिक पाटीलने प्रत्येकी दोन व पवन पांचाळने एक बळी घेत संघाच्या विजयास हातभार लावला.

Web Title: The Packers beat the crowd at Sports