पी. एम. स्वनिधी योजनेचे महापालिकेचे काम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST2021-02-05T07:16:50+5:302021-02-05T07:16:50+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत पी. एम. स्वनिधी योजनेचे कोल्हापूर महापालिकेचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद‌्गार महापालिकेचे प्रभारी ...

P. M. Municipal work of Swanidhi Yojana is commendable | पी. एम. स्वनिधी योजनेचे महापालिकेचे काम कौतुकास्पद

पी. एम. स्वनिधी योजनेचे महापालिकेचे काम कौतुकास्पद

कोल्हापूर : महानगरपालिका अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत पी. एम. स्वनिधी योजनेचे कोल्हापूर महापालिकेचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद‌्गार महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले.

महापालिकेच्यावतीने जीवन ज्योती बीमा योजना, सुरक्षा बीमा योजना, जनधन योजना, श्रमयोगी मानधन, रजिस्ट्रेशन अंडर बीओसीडब्लू, वन नेशन वन रेशन कार्ड, मातृवंदना योजना व जननी सुरक्षा योजनेबाबतच्या ‘स्वनिधी से समृद्धी’ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

महापालिकेने पी. एम. स्वनिधी योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. आतापर्यंत शहरात ३६८१ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. याचा पुढील टप्पा म्हणून ‘स्वनिधी से समृद्धी’ शिबिर राबविले जात आहे. यामध्ये कर्ज प्राप्त लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पात्रतेनुसार शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात महापालिका राज्यात अव्वल असून, त्यांचे काम कौतुकास्पद आहे. पात्र लाभार्थ्यांना त्यांनी त्यांच्या घरातील इतर जे सदस्य विविध योजनेस पात्र आहेत, त्यांनीही योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, उपायुक्त निखिल मोरे, शिल्पा दरेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, एनयूएलएमचे व्यवस्थापक निवास कोळी, रोहित सोनुले, विजय तळेकर, समुदाय संघटक स्वाती शहा, अंजनी सौदलगेकर उपस्थित होते.

रोज शिबीर

महापालिका क्षेत्रात सोमवारपासून शनिवारपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत गांधी मैदान येथील बाळासाहेब खराडे हॉल येथे या स्वनिधी योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

फोटो क्रमांक - ०१०२२०२१-कोल-केएमसी शिबिर

ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वनिधी से समृद्धी’ शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, दीपक पाटील उपस्थित होते.

Web Title: P. M. Municipal work of Swanidhi Yojana is commendable