शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप : राजेंद्र पाटील यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 18:23 IST

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, याला पर्याय म्हणून सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी ४० ऑक्सीजन कोंन्सेटेटर व २५ बायपॅप उपलब्ध करून दिल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी ऑक्सिजन कौंन्सेटेटर व बायपॅप : राजेंद्र पाटील यड्रावकरकोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर फायदेशीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर कमी पडत आहेत, याला पर्याय म्हणून सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी ४० ऑक्सीजन कोंन्सेटेटर व २५ बायपॅप उपलब्ध करून दिल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बुधवारी दिली.

जिल्ह्यातील पारगांव, राधानगरी व गडहिंग्लज येथे प्रत्येकी चार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, आयजीएम इचलकरंजी येथे तीन, कोव्हिड हॉस्पिटल शिरोळ येथे २५ कोंन्सेटेटर उपलब्ध करून दिली आहेत, तसेच शासकीय रुग्णालय गडहिंग्लज येथे 10, कोव्हिड हॉस्पिटल शिरोळ येथे 6 तर आयजीएम इचलकरंजी येथे 9 अशी एकूण 25 बायपॅप दिली असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे.कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारांसाठी या वैद्यकीय उपकरणांचा वापर फायदेशीर ठरत असल्याने व्हेंटिलेटर उपलब्ध होणार नसलेल्या रुग्णांलयामध्ये या उपकरणांचा मोठा लाभ होईल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी ४० ऑक्सिजन कोंन्सेटेटर तर २५ बायपॅप उपलब्ध करून दिली असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांची संख्या पहाता जिल्ह्यातील आरोग्य विभाग सक्षमपणे काम करीत आहे, आरोग्य विभागाबरोबरच शासनाच्या विविध विभागातील फ्रन्टलाइन वर काम करणारे अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत आहेत, असे असताना जनतेनेही काळजी घेताना शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत तरच या महामारीला आपण रोखू शकू असेही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हंटले आहे,

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलministerमंत्रीcollectorजिल्हाधिकारी