सीपीआरमध्ये ऑक्सिजन बेडही शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:19+5:302021-04-30T04:29:19+5:30

कोल्हापूर : रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होत असून, नवे रुग्णही गृह अलगीकरणाला ...

Oxygen beds also balance in CPR | सीपीआरमध्ये ऑक्सिजन बेडही शिल्लक

सीपीआरमध्ये ऑक्सिजन बेडही शिल्लक

कोल्हापूर : रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होत असून, नवे रुग्णही गृह अलगीकरणाला प्राधान्य देत असल्यामुळे सीपीआरमध्ये बेड शिल्लक असल्याचे चित्र बुधवारी रात्री आठ वाजता पाहावयास मिळाले. तसेच शहरातील खासगी रुग्णालयांतही अनेक बेडस् शिल्लक आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांत सर्वत्र बेडस् फुल्ल असल्याचे चित्र होते. परंतु, आता सीपीआरमध्ये मंगळवारी नव्या ६० बेडची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सीपीआरमध्ये एकूण ४१२ बेडची सोय झाली आहे. त्यापैकी आठ शिल्लक असून, ३८ ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. याच पद्धतीने कोल्हापूर शहरामधील शासकीय आणि खासगी ६३ रुग्णालयांमध्ये १७६१ बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी १३७६ बेडवर रुग्ण असून अजून ४३३ बेड शिल्लक आहेत. मात्र, सीपीआर आणि खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट

डिस्चार्ज मोठ्या प्रमाणावर

सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण चांगले आहे. तसेच पॉझिटिव्ह अनेक रुग्ण हे घरामध्येच अलगीकरणात आहेत. तसेच ग्रामीण भागातील रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्येही रुग्णांची सोय होत असल्याने कोल्हापूरमध्ये थोड्या प्रमाणात का असेना, बेड उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Oxygen beds also balance in CPR