शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

‘हिरण्यकेशी’च्या उपसाबंदीला विरोध

By admin | Updated: December 11, 2015 00:52 IST

किसान संघ : आंदोलनाचा इशारा; उपसा नियोजनाची मागणी

गडहिंग्लज : ११ डिसेंबरपासून हिरण्यकेशी नदीतील पाणी शेतीसाठी उपसण्यास पाटबंधारे खात्याने केलेल्या बंदीला भारतीय किसान संघाने तीव्र विरोध केला आहे. जानेवारीपर्यंत उपसा कालावधी वाढवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील उपअभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर २०१५ मध्ये हिरण्यकेशी नदीतील पाण्याच्या नियोजनासंदर्भात किसान संघाचे शिष्टमंडळ उपअभियंत्यांना भेटले होते. त्यावेळी चर्चेसाठी पुन्हा बोलवू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत कोणताही निरोप मिळाला नाही. दरम्यान, अचानक ११ डिसेंबरपासून उपसा बंदीची सूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभ्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हाताशी आलेला ऊस कारखान्याला सुस्थितीत घालविण्यासाठी जानेवारीपर्यंत उपसा कालावधी वाढवावा. जानेवारीनंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शिल्लक पाणीसाठा पाहून उपसा कालावधीचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष बाळगोंड पाटील, राम पाटील, अजित नडगदल्ली, उमाशंकर मोहिते, सुनील कराळे, अशोक देशपांडे, गुरुराज हत्ती, अ‍ॅड. सत्यजित मोळदी, आदींचा समावेश होता. उपसाबंदी ३५ दिवसचित्री धरणात सध्या १३३४ एमसीएफटी पाणीसाठा आहे. त्यापैकी ३०० एमसीएफटी पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्याचा आदेश आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जुलै २०१६ पर्यंत पुरावे यासाठी शेतीसाठी पाणी उपसण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज, शुक्रवारपासून १५ जानेवारी २०१६ अखेर ही उपसाबंदी कायम राहणार आहे.पूर्ण क्षमतेने वीज द्याउपसा काळात वीज यंत्रणा दुरुस्तीची व नूतनीकरणाची कामे काढू नयेत, तांत्रिक अडचण आल्यास वीजप्रवाह बंद ठेवलेला कालावधी वाढवून मिळावा आणि वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने व पूर्ण दाबाने मिळावा अशी मागणीदेखील किसान संघाने महावितरण कंपनीच्या येथील कार्यकारी अभियंत्याकडे निवेदनातून केली आहे.