शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी विकासकामांबद्दल जबाबदारीने बोलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

कागल कागल शहरात ५२ कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. कामे दर्जेदारच होतील. याकडे ...

कागल कागल शहरात ५२ कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. कामे दर्जेदारच होतील. याकडे माझे वैयक्तिक लक्ष आहे. विरोधकांनी विकासकामांबद्दल जबाबदारीने बोलावे, अशी माझी विनंती आहे. टीका करायचीच म्हणून जर काहीही टीका करत असाल तर खपवून घेणार नाही. विनाकारण गैरसमज करू नयेत, असा विनंतीवजा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

कागल शहरातील ७ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, मुख्याधिकारी पंडित पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, चंद्रकांत गवळी, पी. बी. घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपाचे कार्यकर्ते नितीन नासीपुडे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शहरातील महात्मा फुले मार्केटचे संपूर्ण नूतनीकरण, वातानुकूलित तीन मजली मटण फिश मार्केट आणि कंपोस्ट खत डेपोजवळ कत्तलखाना बांधकाम अशा कामांचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. भैय्या माने, रमेश माळी, प्रकाश गाडेकर, यांची भाषणे झाली. आभार सौरभ पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

● नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत कागल शहराचा विकास कोण करू शकतो. हे पाहून मतदान करा. या कागलचे नाव राज्यात कोणी केले तसेच लाथ मारील तेथे पाणी कोण काढेल. हे बघून मतदान करा. मी गेली पस्तीस वर्षे कागल शहरातच राहुन तुमच्या सुख-दुःखात सामील आहे. आतापर्यंत जशी साथ दिली तशीच साथ द्या..

फोटो कॅप्शन

कागल शहरातील महात्मा फुले मार्केटच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, भय्या माने, नवीद मुश्रीफ व मान्यवर उपस्थित होते.