शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलणार

By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST

गडहिंग्लज पालिका : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय

गडहिंग्लज : मे मध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांची मुदत संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन त्याजागी अन्य इच्छुकांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, १५ वर्षांनंतर होणाऱ्या लक्ष्मी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यात्रेच्या नियोजनात व्यत्यय येऊ नये, म्हणून यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलावा, अशी विनंती यात्रा समितीसह प्रतिष्ठित नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून केली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांनी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याची सूचना आमदार मुश्रीफ यांनी केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. नगराध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेत वेळ जाऊन नागरिक व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलाचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.बैठकीस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर, नगरपालिकेतील गटनेते रामदास कुराडे, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)पार्किंग जागा, वाहतुकीबाबत बैठकीत चर्चागडहिंग्लज : मे महिन्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्राकाळातील दुकानदारांची बैठक व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन, पार्किंगच्या जागा आणि नागरी सुविधांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, उपसरपंच वैभव साबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यात्रा कालावधीत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नगरपालिका व पोलिसांनी वाहनतळांची जागा निश्चित करावी. बसगाड्यांसह खासगी वाहनांच्या वाहतुकीबाबतही निश्चित धोरण ठरवावे, अशी सूचना तहसीलदारांनी केली.यात्रेनिमित्त शहरात येणाऱ्या विविध स्टॉलधारकांच्या बैठकीची व्यवस्था पालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे करावी. यात्रेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जागांची निश्चिती करावी, अशी सूचना त्यांनी केली. यात्रेसाठी मागविण्यात येणाऱ्या मिनीबसेसऐवजी गडहिंग्लज शहरातील वाहतुकीच्या डबलडोअरच्या बसगाड्या मागवाव्यात, अशी सूचना करण्यात आली. यात्रा कालावधीत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी रिंगरोडवरील जमीनमालक शेतकऱ्यांच्या सहमतीने किमान तात्पुरती वाहतूक सुरू करावी, अशी सूचनादेखील करण्यात आली. बैठकीस नगरअभियंता रमेश पाटील, जलअभियंता जमीर मुश्रीफ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे, आगारप्रमुख सुनील जाधव, यात्रा समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, काशिनाथ देवगोंडा, अमरनाथ घुगरी, सुधीर पाटील, आदींसह विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)