शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांना आयुक्तांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 16:29 IST

प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्लॅस्टिकच्या पिशवीतून खाद्यपदार्थांचा पुरवठा दोन कंपन्यांना पाच हजारांचा दंड

कोल्हापूर : प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.झोमॅटो आणि स्विगी या ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनीमार्फत प्लास्टिक पिशवीमधून खाद्यपदार्थ दिले जातात, अशी तक्रार आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे आली होती. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना खात्री करुन संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डॉ. विजय पाटील यांनी प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकाला ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास सांगितले.संबंधित कंपनीकडून ही आॅर्डर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत आल्यावर पथकाने खाद्यपदार्र्थांची आॅर्डर तपासली असता ते खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशवीमधून आणल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे झोमॅटो आणि स्विगी या दोन्ही कंपन्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आणि दंडाची पावती संबंधितांना देण्यात आली.

याशिवाय ज्या हॉटेलमधून हे खाद्यपदार्थ मागविण्यात आले होते, त्या कोल्हापूर डायनिंग हॉटेललाही पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाई वेळी विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर आरोग्य निरीक्षक सुशांत शेवाळे, सुशांत कावडे, मनोज लोट व श्रीराज होळकर उपस्थित होते.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीZomatoझोमॅटोSwiggyस्विगीcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर