शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

घोसरवाडचा एकजण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST

कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे पाचवा मैल-घोसरवाड मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलला उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील ...

कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे पाचवा मैल-घोसरवाड मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलला उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील अनिल दत्तू कोळी (वय ५५, रा. पाचवा मैल, घोसरवाड) हा जागीच ठार झाला, तर बाहुबली कुमार जंगटे हा गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री साडेनऊच्यासुमारास पाचमैल-घोसरवाड रस्त्यावर जमादार टेक येथे हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक शहाजी सुखदेव जाधव (रा. कोळवाडी, जि. बीड) याच्याविरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार कुमार दत्तात्रय तराळ यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार अनिल कोळी व बाहुबली जंगटे हे मोटारसायकल (क्र. एमएच ०९ सी झेड ४११५) वरुन घोसरवाडच्या दिशेने जात होते. याचवेळी घोसरवाडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिल्याने रस्त्यावर डोके आपटल्याने कोळी यांचा जागीच मृत्यू झाला; तर जंगटे गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहन सोडून पळून गेला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.

फोटो - ०८०२२०२१-जेएवाय-०४-मृत अनिल कोळी