आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच टार्गेट

By Admin | Updated: December 29, 2016 00:20 IST2016-12-29T00:20:48+5:302016-12-29T00:20:48+5:30

रेश्मा माने

Olympic gold medal in the tournament | आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच टार्गेट

आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक हेच टार्गेट

कोल्हापूर : राष्ट्रकुल स्पर्र्धेत सुवर्णपदक पटकावले, आता आॅलिम्पिकमध्ये धडक मारून कोल्हापूरची कुस्ती सातासमुद्र पार नेणे, हेच टार्गेट असल्याचे प्रतिपादन पैलवान रेश्मा माने यांनी केले. सांगरूळ (ता. करवीर) येथील रंगीला ग्रुपच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ती बोलत होती.
आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आनंदराव नाळे, विविध स्पर्धा व परीक्षेतील गुणवंत कोमल मडके, यश पाटील, अनिकेत कासोटे, सर्वेश खाडे, शुभम खाडे, प्रतीक गुरव, आदिती वागवेकर यांच्यासह उमेद फौंडेशनचा गौरवही यावेळी करण्यात आला. स्वागत ग्रुपचे अध्यक्ष धनाजी मडके यांनी केले.
गगनबावडा शिक्षक पतसंस्थेचे संचालक संताजी पाटील, महालक्ष्मी पाणीपुरवठा संस्थेचे सचिव धोंडिराम खाडे, पांडुरंग मोहिते, विश्वास भोसले, ‘कुंभी-धरण’ संस्थेचे संचालक उत्तम खाडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य रंगराव कोळी, दीपक घोलपे, संजय खाडे, सुरेश चाबूक, नीलेश सुतार,
मच्छिंद्र कांबळे, चंद्रकांत म्हेत्तर, कृष्णात पोवार, निवास यादव, विलास गुरव, संदीप वागवेकर, दिलीप खाडे, विष्णू खाडे, सरदार खाडे,
कृष्णात खाडे, सागर खाडे उपस्थित होते.

Web Title: Olympic gold medal in the tournament