शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मंजूर ले-आऊटमधील ओपन स्पेस ताब्यात घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात गेली अनेक वर्षे मोकळ्या जमिनीचे प्लॉट पाडून ले-आऊट द्वारा त्यांची विक्री व विकास सुरू आहे. ...

कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात गेली अनेक वर्षे मोकळ्या जमिनीचे प्लॉट पाडून ले-आऊट द्वारा त्यांची विक्री व विकास सुरू आहे. अशा मंजूर ले-आऊटमधील खुल्या जागा महापालिकेने अद्याप ताब्यात घेतलेल्या नाहीत. त्या तातडीने ताब्यात घेऊन त्यावर महापालिकेचे नाव लावावे, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे पाटील व किरण नकाते यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले.

महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने सुरुवातीपासून शेकडो ले-आउट मंजूर केले आहेत. त्यावर आता मोठ्या कॉलनीज वसलेल्या आहेत. या ले-आउटमधील खुली जागा, नागरी सुविधांच्या जागा, ले-आउट विकसित करतेवेळी महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याचा कायदा आहे. तरीसुद्धा कोल्हापूर शहरातील शेकडो ले-आऊटच्या खुल्या जागा महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने आपल्या ताब्यात घेतलेल्या नाहीत, तसेच त्यांच्या कागदपत्रावर महानगरपालिकेचे नावही चढविलेले नाही.

काही जुन्या ले-आऊटमधील खुल्या जागा बेकायदेशीर पद्धतीने विक्री करण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून नगररचना विभागाच्या दुर्लक्षामुळे व बेजबाबदारपणामुळे महानगरपालिकेच्या शेकडो जागा खासगी मिळकतीत तबदील होण्याची शक्यता आहे. म्हणूनच या प्रकरणी प्रशासक म्हणून तातडीने व वैयक्तिक लक्ष घालून सर्व खुल्या जागा ताब्यात घेऊन त्यावर महानगरपालिकेचे नाव लावावे आणि महानगरपालिकेचे होणारे नुकसान टाळावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.