शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ईदनिमित्त ‘गोकुळ’ची उच्चांकी १५.२५ लाख लिटर्सची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

(फोटो-२१०७२०२१-कोल-विश्वास पाटील) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) बुधवारी बकरी ईदनिमित्त आतापर्यंतच्या ...

(फोटो-२१०७२०२१-कोल-विश्वास पाटील)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) बुधवारी बकरी ईदनिमित्त आतापर्यंतच्या एक दिवसाच्या विक्रीचा उच्चांक गाठला. तब्बल १५ लाख २५ हजार लिटर विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख ६३ हजार विक्रीत वाढ झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

‘गोकुळ’ने उत्‍पादक व ग्राहकांचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना जास्‍तीत जास्‍त लाभ करून देण्‍यासाठी नेहमीच प्रयत्‍न केलेला आहे. विक्रीमध्‍ये नवीन मानदंड प्रस्‍तापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवलेले असून हे उद्दिष्‍ट दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर साध्‍य करू, असा विश्‍वास अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, दूध संस्था ग्राहक वितरक व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्‍यामुळे ते कौतुकास पात्र असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याकडून अभिनंदन

‘गोकुळ’च्या व्यवस्थापनाने दूध विक्रीसाठी उत्कृष्ट काम केले असून उच्चांकी विक्री केल्याबद्दल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यवस्थापनाचे अभिनंदन केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.