शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेत परिचारिका ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

--------------------------------------------------- कोल्हापुरात मार्चमध्ये भटक्या विमुक्तांची सामाजिक न्याय हक्क परिषद कोल्हापूर : राज्यकर्त्याकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री ...

---------------------------------------------------

कोल्हापुरात मार्चमध्ये भटक्या विमुक्तांची सामाजिक न्याय हक्क परिषद

कोल्हापूर : राज्यकर्त्याकडून प्रश्नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्नांची जंत्री वाढतच चालली आहे. यावर विचारमंथन करून आंदोलनात्मक दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात भटक्या विमुक्तांची राज्यस्तरीय सामाजिक न्याय हक्क परिषद भरवण्यात येणार आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याचे नियोजन करण्याचे शुक्रवारी झालेल्या प्राथमिक बैठकीत ठरविण्यात आले. दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

---------------------------------------------------

मिरजेत रेल्वेच्या हद्दीतील घरे हटविण्याला विरोध

मिरज (जि.सांगली) : मिरजेतील रेल्वे स्थानकालगत झोपडपट्टीसह सांगली रस्त्यावरील कुष्ठरुग्ण वसाहतीतील घरे हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. माजी आमदार शरद पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन घरे पाडण्याच्या कारवाईस विरोध केला. रेल्वेच्या स्थानकालगत झोपडपट्टी रिकामी करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.

---------------------------------------------------

सांगलीत दहशत माजवत लुटणारे अटकेत

सांगली : शहरातील गणेश मार्केटमधील व्यापाऱ्यांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली. अरबाज अस्लम खान (वय २१), अक्षय संतोष निकम (२१), करण प्रकाश गोसावी (२३, तिघेही रा. गल्ली क्रमांक पाच, प्रकाशनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.

---------------------------------------------------

वणवा लावल्याप्रकरणी पंधरा हजारांचा दंड

दहीवडी (जि. सातारा) : वरकुटे मलवडी येथे पाचट पेटविल्यानंतर लावली गेलेली आग वनक्षेत्रात पसरली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वनविभागाचे नुकसान झाले. याप्रकरणी भिवा जगन्नाथ खरात या व्यक्तीला वनविभागाने अटक केली. त्याला वणवा लावल्याप्रकरणी पंधरा हजारांचा दंड व न्यायालय उठेपर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली.

---------------------------------------------------

रोकडसह पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचगणी (जि.सातारा) : मुलीच्या लग्नकार्याच्या धावपळीत हॉलमध्ये ठेवलेली सोन्याचा ऐवज व एक लाखाची रोकड असलेली पिशवी असा सुमारे १ लाख ८१ हजार ६०० चा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

---------------------------------------------------

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे झाले स्वच्छ

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार लाडघर (ता. दापोली), वाडावेत्ये, कशेळी (ता. राजापूर) आणि भाट्ये (ता. रत्नागिरी) या ठिकाणी संबंधित कंपनींच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याची जबाबदारी असलेल्या फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने जिल्हाधिकारी मिश्रा तसेच तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या उपस्थितीत हा किनारा स्वच्छ करण्यात आला.

---------------------------------------------------

रत्नागिरी जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके

रत्नागिरी : जिल्ह्यात २२ तीव्र कुपोषित बालके असून, त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यासाठी ग्रामीण बालविकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या बालकांना अतिरिक्त पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविकांवर देण्यात आली आहे. मात्र, अनुदान नसल्याने हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अंगणवाडीसेविकांकडून करण्यात येत आहे.

---------------------------------------------------

सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन रखडली

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : सेवानिवृत्त शिक्षकांचीच पेन्शन रखडली असून प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत आहोत, अशी माहिती महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन सिंधुदुर्गचे सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी दिली. जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी २०२१ चे निवृत्तिवेतन सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक वगळून उर्वरित सर्व राज्य सरकारी, जिल्हा परिषद, माध्यमिक विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रदान करण्यात आले आहे.