शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले पश्चिम विभागात रुग्ण संख्या घटली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

दिलीप चरणे लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : हातकणंगले तालुका पश्चिम विभागातील पारगाव परिसरातील चौदा गावात कोरोना रुग्णांची संख्या ...

दिलीप चरणे

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : हातकणंगले तालुका पश्चिम विभागातील पारगाव परिसरातील चौदा गावात कोरोना रुग्णांची संख्या घटु लागली आहे. थोडंसं दिलासादायक चित्र पहायला मिळत असले तरी मृत्युचे प्रमाण वाढू लागले असून, मृत्यू प्रमाण ४.२४ टक्के झाले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर नियम न पाळता नागरिक सैरभैर वागत राहिले तर पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकेल.

हातकणंगले तालुक्यातील ६२ गावांपैकी चौदा गावांचा समावेश पश्चिम विभागात होतो. निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, पाडळी, मनपाडळे, अंबप, अंबपवाडी, तळसंदे, चावरे, वाठार, किणी, घुणकी, भादोले व लाटवडे या चौदा गावांचा आढावा घेतला. या चौदा गावात आजपर्यंत ८९५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. पैकी ६८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १७३ रुग्ण उपचाराखाली आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.४३ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण विचारात घेतले असता, नागरिकांनी नियम पाळून काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

वाठार, मनपाडळे, पाडळी, अंबपवाडी या गावात मृत्यू संख्या शून्य आहे. नवे व जुने पारगावात मिळून १२ जणांचे कोरोनाने मृत्यू झाले आहेत. पारगावची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन स्थानिक कोरोना समितीने कडक निर्बंध लावले, त्यामुळे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली, हे स्थानिक प्रशासन व वैद्यकीय यंत्रणेचे यश आहे. गावातील दुकानांसह केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवल्या आहेत.

कोरोना रुग्णसेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नवे पारगावचे शासकीय ग्रामीण रुग्णालय, अंबप व भादोले प्राथमिक आरोग्य केंद्र अहोरात्र सेवा देत आहेत. पारगाव ग्रामीणचे अधीक्षक डॉ. एम. जी. मुजावर, अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड, भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माहेश्वरी कुंभार व त्यांचे कर्मचारी,आरोग्य सेवक, आशा वर्कर व कोविड कर्तव्यात असणारे शिक्षक अविश्रांत श्रम घेत आहेत.

चौदा गावची कोरोनाची सध्याची स्थिती खालील तक्त्यावरून स्पष्ट होत आहे.

तक्ता