शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

आता इंटरनेटवरही निकाल

By admin | Updated: November 1, 2015 00:32 IST

महापालिका निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण; पाच ठिकाणी स्पीकरची व्यवस्था

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी मतमोजणी होणार असून, त्याची तयारी प्रशासनाने शनिवारीच पूर्ण केली. सर्व ८१ प्रभागांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. मतमोजणीचा निकालही तत्काळ स्पीकरवरून व इंटरनेटच्या माध्यमातून जाहीर केला जाणार आहे. याकरिता सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सात विभागीय निवडणूक कार्यालयांतर्गत सात ठिकाणी सरासरी ११ किंवा १२ प्रभागांची एकत्रित मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तर संपूर्ण मतमोजणीसाठी स्वतंत्र २६७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक निकाल ज्या-त्या विभागीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेरची सही झाल्यानंतर निवडणूक निरीक्षकांकडे सुपूर्द केला जाणार आहे. विद्यापीठ, कळंबा फिल्टरचा पहिला गुलाल शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उद्या, सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. लोकसभा व विधानसभेची मतमोजणी ही सकाळी आठ वाजता सुरू होते. कारण त्यांची मतमोजणी मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नसते. एक दिवसाची मध्ये सुटी असते; परंतु महापालिकेसाठी आज, रविवारी मतदान आहे व लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी मतमोजणी होत आहे. त्यामुळे त्यांना मतमोजणीच्या कामासाठी पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. महापालिकेचे एकूण ८१ प्रभाग असले तरी प्रत्येक प्रभागात जितकी मतदान केंद्रे असतील, तितक्या मतमोजणीच्या फेऱ्या होतील. प्रत्येक प्रभागात सरासरी तीन ते सहा केंद्रे आहेत. शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय (प्रभाग क्रमांक ६४) आणि कळंबा फिल्टर हाऊस (प्रभाग क्रमांक ६८) या प्रभागांत प्रत्येकी तीन केंद्रे असल्याने या दोन प्रभागांचा निकाल सकाळी अकरा वाजताच जाहीर होईल. पहिला अर्धा तास टपालाची मतमोजणी होईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत सगळा निकाल जाहीर होईल. मोबाईलवरही अ‍ॅप एखाद्या मतदाराला आपले मतदान केंद्र कोठे आहे हे पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून मोबाईलसाठी अ‍ॅपही तयार केले आहे. नाव आणि क्षेत्र त्यात घातले की आपले मतदान केंद्र किती अंतरावर, कोठे आहे, याची माहिती मिळेल. उमेदवाराची संपत्ती, गुन्हे याची माहिती ‘पोलिंग बुथ व्होटर’ या अ‍ॅपद्वारे मिळणार आहे. निकाल ६६६.‘ेू येथेही पाहण्यास मिळणार आहेत.