शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नदी प्रदूषणप्रश्नी आयुक्तांना नोटीस

By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST

सांडपाणी कृष्णा नदीत : खटला दाखल करण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा

नरेंद्र रानडे - सांगली नदीत मिसळणाऱ्या वाढत्या सांडपाण्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने शनिवारी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे, अशी माहिती मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए. एस. हजारे यांनी रविवारी दिली. प्रदूषणप्रकरणी महापालिकेवर खटला दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे कृष्णेच्या पात्रातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात कमी होऊन यंदाच्या वर्षीही ती घटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचवेळी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. शेरीनाल्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याशिवाय अन्य नाल्यांमधील सांडपाणीही नदीत मिसळत आहे. वास्तविक वॉटर पोल्युशन अ‍ॅक्टनुसार महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते नदीत सोडणे गैर आहे. परंतु या कायद्याला नेहमीच केराची टोपली दाखविण्यातच मनपातील आरोग्य विभागातील अधिकारी धन्यता मानत आले आहेत. मागीलवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाण्याच्या प्रश्नावरुनच महापालिकेची दहा लाखांची बँक हमी जप्त केली होती. याला देखील काहींचा आक्षेप आहे. कारण जी रक्कम जप्त करण्यात आली, ती जनतेच्या करातून आलेली रक्कम होती. अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा नागरिकांना का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.सध्या सांडपाणी प्रश्नाकडे मनपाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता, प्रदूषण नियंत्रण मंडळाने शनिवार दि. २१ रोजी खटला का दाखल करण्यात येऊ नये? अशी नोटीस मनपाला पाठविली आहे. नोटिसीला उत्तर देण्याकरिता सात दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर पुढील पावले उचलली जाणार आहेत. अशी आहे शेरीनाला योजना...वसंतदादा स्मारकाच्या उत्तरेस शेरीनाल्याच्या पाण्याचा साठवण तलाव आहे. तेथे पंपिंग स्टेशन व जॅकवेल उभारण्यात आले आहे. तेथून ९०० मिलिमीटरची कवलापूरपर्यंत ८ हजार ४३० मीटर लांबीची जलवाहिनी बसविण्यात आली आहे. कवलापुरात पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्पाची मूळ किंमत २५ कोटी २४ लाख ८८ हजार इतकी होती. अडचणींचे टप्पे पार करत करत ती ३४ कोटी ९५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले असले, तरी अजूनही एक कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. म्हणजे ही योजना कार्यान्वित होईपर्यंत ३६ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. धुळगाव येथील प्रक्रिया होऊन बाहेर पडणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेचे काम शिल्लक आहे. पैशाअभावी हे काम रखडले आहे. मनपा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साटेलोटे असल्याने फक्त ‘नोटीस एक्के नोटीस’ हेच मंडळाचे धोरण राहिलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मंडळाच्या या मनमानी कारभाराविरोधात आम्ही पत्रव्यवहार केला असून, त्याचे कोणतेही उत्तर अद्याप आलेले नाही. त्यामुळे लवकरच आम्ही हरित न्यायालयात मंडळ व मनपा यांच्याविरोधात याचिका दाखल करणार आहोत .- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली शहर सुधार समिती.प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत अनेकवेळा महापालिकेस केवळ नोटिसा दिल्या आहेत. मात्र थेट कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. यावेळी देखील मंडळाने तीच परंपरा जोपासली आहे. नोटिसा बजावण्यात धन्यता मानण्यापेक्षा संबंधितांना न्यायालयात खेचणे आवश्यक आहे.- डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत, सांगली..