वकीलच न देणे हा ओबीसींचा विश्वासघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:11+5:302021-09-15T04:28:11+5:30

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासांचे आरक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडीने वकील न देणे, हा ...

Not giving a lawyer is a betrayal of OBCs | वकीलच न देणे हा ओबीसींचा विश्वासघात

वकीलच न देणे हा ओबीसींचा विश्वासघात

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासांचे आरक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडीने वकील न देणे, हा या समाजाचा विश्वासघात आहे. या विरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार म्हणाले, महाविकास आघाडीला ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही. ते न देता, त्यांना निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यांच्याविरोधात वातावरण तापविणार आहोत. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, मंत्री विजय वडेड्डीवार यांनी दोन महिन्यांत इम्पिरिकल डाटा तयार करणार असल्याचे जाहीर केले हाेते. मग सहा महिने झाले, तरी तो तयार का झाला नाही? सरचिटणीस अशोक जाधव म्हणाले, मराठा समाजाप्रमाणेच ठाकरे सरकारने ओबीसींचाही विश्वासघात केला आहे.

सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले, या प्रकरणावरून छगन भुजबळ यांनी मंत्रिपद सोडण्याची गरज आहे. यावेळी दिलीप मैत्राणी, महेश यादव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सरचिटणीस तुषार देसाई उपस्थित होते.

Web Title: Not giving a lawyer is a betrayal of OBCs