शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘अशासकीय’चे शेपूट वाढणार

By admin | Updated: August 19, 2014 23:37 IST

बाजार समिती : १६वा सदस्य म्हणून राधानगरीच्या राजेंद्र भाटले यांची नेमणूक ?

राजाराम लोंढे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाची सदस्य संख्या वाढू लागली आहे. गेले आठ-दहा दिवस याबाबत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये खलबते सुरू होती, अखेर आज, मंगळवारी एस.टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या निवडीचे पत्र आणल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कार्यकर्त्यांची सोय करण्याच्या नादात बाजार समितीचे ‘आदान’ मात्र लांबणार, हे मात्र निश्चित आहे. संचालक मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे बाजार समितीवर प्रशासक आले. गेले दहा महिने प्रशासकांनी समिती प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. समितीचा खर्च कमी झाल्याने सहा महिन्यांत उत्पन्न वाढत गेले; पण दोन्ही कॉँग्रेसने निवडणुकीच्या तोंडावर आपल्या कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी प्रशासकांना हटवून अशासकीय प्रशासक मंडळ आणले. दोन्ही कॉँग्रेसपैकी बाजार समितीवर ज्याची सत्ता होती, त्यांना सात जागा आणि दुसऱ्याला सहा जागा द्यायचा हा फार्म्युला राज्य पातळीवर ठरला होता. त्यानुसार कोल्हापूर बाजार समितीवर राष्ट्रवादी-जनसुराज्य-शेकापची सत्ता होती. विरोधी कॉँग्रेसचे दोन सदस्य होते. त्यामुळे येथे राष्ट्रवादीला सात व काँग्रेसला सहा जागा मिळणे अपेक्षित होते; पण राष्ट्रवादीने नऊ जागा घेत कॉँग्रेसला सहा दिल्या. यामध्ये करवीर, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी व कोल्हापूर शहर अशा प्रत्येक एक जणांची वर्णी लावली. कागल तालुक्यातून दोन सदस्य दिले. एक जागा जनसुराज्य पक्षाला दिली; पण यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राधानगरी तालुक्याला प्रतिनिधित्वच दिले नाही. संचालक मंडळात राधानगरीचे दोन संचालक होते. उलट सहा जागा असतानाही कॉँग्रेसने राधानगरीला प्रतिनिधित्व दिले. याची सल एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांना गेले दहा-बारा दिवस बोचत होती. या विषयीची नाराजी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार के. पी. पाटील यांच्याकडे बोलून दाखविली होती. एस.टी.महामंडळ संचालक पदाचा आणि या नेमणुकीचा काही संबंध नसल्याचे सांगत ए. वाय. पाटील यांनी आणखी एक प्रतिनिधित्वाचा हट्ट धरला. अखेर आज राजेंद्र भाटले (हुडा-राधानगरी) यांची नेमणूक केल्याचे सूत्रांकडून समजते. ‘शेकाप’ नाराज! बाजार समिती, केडीसीसी, गोकुळसह सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचा जनसुराज्य व शेकाप हे पारंपरिक मित्र पक्ष आहेत. बाजार समितीच्या सत्तेत ‘शेकाप’चा एक संचालक होता; पण अशासकीय मंडळात राष्ट्रवादीने जनसुराज्यला संधी दिली, पण ‘शेकाप’ला डावलल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे. कॉँग्रेसही आक्रमक ? मुळात राष्ट्रवादीने तीन जागा जास्त घेतल्या आहेत. त्यात आणखी एक सदस्य वाढविल्याने कॉँग्रेसचे नेतेही आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशासकीय समितीची ही शेपूट आणखी वाढण्याची शक्यता आहे.