कोल्हापुरात आवाजाची पातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:08+5:302021-09-21T04:28:08+5:30

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे गर्दी नियंत्रणात असतानाही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अनंत चतुर्दशीदिवशी रविवारी (ता.१९) आवाजाच्या पातळीत वाढ झाली. ...

Noise level increased in Kolhapur | कोल्हापुरात आवाजाची पातळी वाढली

कोल्हापुरात आवाजाची पातळी वाढली

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे गर्दी नियंत्रणात असतानाही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अनंत चतुर्दशीदिवशी रविवारी (ता.१९) आवाजाच्या पातळीत वाढ झाली. गतवर्षीपेक्षा जास्त लोक रस्त्यावर आल्याने आणि ध्वनिक्षेपक यंत्राचा वापर केल्याने ध्वनी पातळीत वाढ झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. यासंबंधीचे सर्वेक्षणही शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने केले आहे. पर्यावरणशास्त्र विभागाने रविवारी शहरातील चार विभागांतील २२ ठिकाणी आवाजाची पातळी यंत्राव्दारे मोजली. संध्याकाळी ६ ते १२ या वेळेत ही मोजणी करण्यात आली. यातून गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी ध्वनी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. प्रा. डॉ. पी. डी. राऊत, प्रा. डॉ. असावरी जाधव, डॉ. पी. आर. भोसले, सी. एस. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय परीट, ऋतुराज पिंगळे, स्वस्तिक शिंदे, मनोज गुरव यांनी हे सर्वेक्षण केले.

कोट

कोरोनामुळे गतवर्षी अनंत चर्तुदशीदिवशी रस्त्यावर भाविक कमी होते. त्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी जास्त राहिली. फटाके, ध्वनिक्षेपकाचाही वापर गतवर्षीपेक्षा अधिक राहिला. त्यामुळे ध्वनी पातळी वाढलेली दिसते.

प्रा. डॉ. असावरी जाधव, प्रभारी विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग

अंतन चतुर्दशीच्यादिवशी शहरातील ध्वनी पातळी (आकडे डेसिबल)

क्षेत्र, परिसराचे नाव, २०२०, २०२१

सीपीआर, ५५.९७, ५६.०६

न्यायालय, ४६.५१ ५१.०३

जिल्हाधिकारी कार्यालय ४५.६२, ५५.०४

शिवाजी विद्यापीठ ४१.७३ ३९.९०

रहिवासी भाग

राजारामपुरी ३९.४७, ४०.०१

उत्तरेश्वर पेठ ४६.५२, ५१.०२

शिवाजी पेठ ४६.६५, ४४.०९

मंगळवार पेठ ३८.१७, ४६.२०

नागाळा पार्क ४०.२९, ४४.२३

ताराबाई पार्क ४६.८७, ४७.३०

व्यावसायिक

मिरजकर तिकटी ५१.७६, ५४.०१

बिनखांबी गणेश मंदिर ४४.९३, ५७.०६

महाद्वार रोड ५४.०५, ५२.३०

गुजरी कॉर्नर ४३.७९, ५२.०१

पापाची तिकटी ५९.६४, ६०.०२

राजारामपुरी ५१.०२, ५२.०३

लक्ष्मीपुरी ४२.९३, ५४.०८

शाहूपुरी ४२.०५, ५३.०२

गंगावेश ६०.६९, ६३.०८

बिंदू चौक ५२.४०, ५५.१०

औद्योगिक

उद्यमनगर ४५.१२, ५६.५०

वाय. पी. पोवारनगर ४३.४५, ५४.६०

Web Title: Noise level increased in Kolhapur